Wed, Feb 20, 2019 16:01होमपेज › Sports › वीरेंद्र सेहवागला सापडला, 'मेस्सीचा काका'!

वीरेंद्र सेहवागला सापडला, 'मेस्सीचा काका'!

Published On: Jul 12 2018 12:54PM | Last Updated: Jul 12 2018 12:54PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

रशियात सुरू असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे वेड अख्या जगाला लागले आहेच पण नुसते बघण्याचे नाहीतर खेळण्याचेदेखील वेड लागले आहे. सध्या  फुटबॉल विश्वचषकाची स्पर्धा अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे ट्रॉफी जिंकण्यासाठी फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. याच दरम्यान माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर एका जेष्ठ व्यक्तीचा फुटबॉल खेळत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.  

या व्हिडिओत ती  व्यक्ती फुटबॉल खेळताना फुटबॉलला अशी किक मारतो की तो बॉल थेट समोरी खिडीकीतून घरात जातो. फुटबॉल चाहत्यांनी या व्यक्तीच्या खेळाची कामगिरी पाहुन स्टार फुटबॉलपटू मेस्सीसोबत त्याची तुलना केली आहे. सेहवागने हा व्हिडिओ शेअर करतेवेळेस तो म्हटले आहे की, फ्रान्स, इंग्लंड, क्रोएशियनला या सघांना विसरा ...इथे पाहा #मेस्सीचा काका..., अशी कॅप्शन दिली आहे. 

Forget France , England, Croatia, here is the man #messikechacha

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag) on

रशियात सुरु असलेल्या २१व्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढत क्रोएशिया  विरुद्ध फ्रान्स अशी होणार आहे.