Wed, Apr 24, 2019 09:29होमपेज › Sports › एक्स्ट्रा टाईमच्या बादशाहांनी इतिहास रचला

एक्स्ट्रा टाईमच्या बादशाहांनी इतिहास रचला

Published On: Jul 11 2018 11:29PM | Last Updated: Jul 12 2018 2:08AMमॉस्को : पुढारी ऑनलाईन 

एक्स्ट्रा टाईमचे बादशाह असलेल्या क्रोएशियाने इंग्लंडचा एक्स्ट्रा टाईममध्ये केलेल्या दुसऱ्या गोलच्या जीवावर सेमी फायनल जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला. क्रोएशियाने फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या विश्चचषकात फुटबॉल जगताला नवा विजेता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

फिफा विश्चचषकातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात पहिल्या हाफ मध्ये इंग्लंडने पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक खेळ केला. पाचव्या मिनिटाला क्रोएशियाच्या डीबाहेर मिळालेल्या फ्री किकवर ट्रिपीअरने गोल करत धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या गोलनंतर आत्मविश्वास दुणावलेल्या इंग्लंडने आपल्या आक्रमणाची धार वाढवली. त्यांनी क्रोएशियाच्या गोलपोस्टवर चढायांचा धडाकाच लावला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला गोल करण्याच्या दोन चांगल्या संधी मिळाली पण त्याने त्या दवडल्या नाहीत इंग्लंडला ३-० अशी आघाडी मिळाली असती. 

क्रोएशियाने देखील काही चांगल्या चाली रचल्या पण, त्याना इंग्लंडच्या बचावामुळे गोल करता आला नाही.  

दुसरा हाफ सुरु झाल्यानंतर पहिली काही मिनिटे इंग्लंडने आक्रमण केले. पण, त्यांना आघाडी वाढवण्यात अपयश आले. क्रोएशियाने दुसऱ्या हाफमध्ये नियंत्रित खेळ करत इंग्लंडच्या गोलपोस्टवर एक उत्कृष्ट चाल रलची व्रसाल्कोच्या क्रॉसवर प्रेसिकने ६८ व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर इंग्लंडची क्रोएशियाचे प्रतिआक्रमणे रोखण्यात दमछाक झाली. क्रोएशियाने पाठोपाठ चढाई कली पण बॉल गोलपोस्टला लागून परत आला. तो बॉल क्रोएशियाने परत गोलजाळ्यात धाडण्याचा प्रयत्न केला पण गोलकिपर पिकफोर्डने फटका आडवला. 

दुसऱ्या हाफमधील खेळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसे क्रोएशियाने इंग्लंडच्या गोलपोस्टवर चाली रचल्या. पण नियमीत वेळेत दोन्ही संघांना आघाडी घेता आली नाही. त्यामुळे सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. 

एक्स्ट्रा टाईममध्ये इंग्लंडने क्रोएशियावर एका चांगली चाल रचली पण, क्रोएशियाच्या बचावपटूने तो फटका हेडद्वारे बाहेर काढला. त्यानंतर क्रोएशियाच्या मॅडज्युइकने आक्रमण करत इंग्लंडच्या गोलपोस्टच्या दिशेने फटका मारला पण तो गोलकिपरने आडवला त्यामुळे एक्सट्रा टाईमचा पहिला हाफ गोलविना गेला. 

त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये मिळालेल्या संधीचा फायदा घेत मारिओ मॅडज्युइकने १०९ व्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली. या आधी क्रोएशियाने २ सामने एक्स्ट्रा टाईममध्ये गोल करुन जिंकेले आहेत. याही सामन्यात विजयी गोल त्यांनी एक्स्ट्रा टाईममध्येच मारून फायनलचे तिकिट मिळवले.