Wed, Jul 24, 2019 14:59होमपेज › Sports › इंडियाची खेळी पाहून पाकचा कर्णधार म्हणाला Good Night

इंडियाची खेळी पाहून पाकचा कर्णधार म्हणाला Good Night

Published On: Jun 17 2019 12:26PM | Last Updated: Jun 17 2019 12:36PM
मॅचेंस्टर : पुढारी ऑनलाईन 

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यात भारताने पाकच्या गोलंदाजांची धुलाई केली. हिटमॅन रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकी भागिदारी केली. हिटमॅननं शतक केले तर केएल राहुल आणि विराट कोहलीनं अर्धशतके केली. या खेळीच्या जोरावर भारताने ५ बाद ३३६ धावा केल्या. सामन्यादरम्यान भारताच्या फलंदाजांनी पाकच्या खेळाडूंची झोप उडवली असली तरी पाकचा कर्णधार सरफराज अहमद Good Night म्हणण्याच्या नादात असल्याचे पाहायला मिळाले. 

पावसाच्या व्यत्ययानंतर जेव्हा सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा सरफराज हा जांभई देत असताना कॅमे-यात टिपला गेला. त्याचे मैदानावर जांभई देतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. त्याची ही चूक त्याला चांगलीच महागात पडली. भारतीय चाहत्यांनी ट्विटरवर सरफराजचा जांभई देतानाचा फोटो शेअर करत त्याची चांगलीच खिल्ली उडवली. 

सामन्यापूर्वी सरफराजने खेळाडूंना ताकीद दिली होती की, भारताविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. यात कोणतीही चूक नको. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करावी लागेल. खेळात कमी पडल्यास काहीही कारण चालणार नाही. पण स्वतःच सरफराज या सुचना विसरला असल्याचे पाहायला मिळाले.