Mon, Dec 10, 2018 03:54होमपेज › Sports › IPL : 'त्‍या' कॉमेंटमुळे प्रीती झिंटा भडकली (Video)

IPL : 'त्‍या' कॉमेंटमुळे प्रीती झिंटा भडकली (Video)

Published On: Apr 17 2018 11:35AM | Last Updated: Apr 17 2018 11:35AMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

इंडियन प्रिमियर लीगमध्ये रविवारी पंजाबविरुध्‍दच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शेवटच्‍या चेंडूत षट्‍कार मारला खरा. परंतु, त्‍याला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. अश्विनच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबने या सामन्यात चेन्नईला चार धावांनी पराभूत केले. घरच्या मैदनावर सामना जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना पंजाब संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटाने फॅन्‍सना टी-शर्टचे वाटप केले. फॅन्सना टी-शर्ट देताना गर्दीतून एकाने प्रीतीवर काहीतरी कॉमेंट्‍स केली. यामुळे प्रीतीचा रागाचा पारा शंभरवर पोहोचला. 'त्‍या' कॉमेंटमुळे भडकलेल्‍या प्रीतीने त्‍या व्‍यक्‍तीसोबत हुज्‍जत घातली. या वादाचा एक व्‍हिडिओ सध्‍या यू-ट्‍यूबवर व्‍हायरल होत आहे. 

प्रीतीवर त्‍या व्‍यक्‍तीने काय कॉमेंट दिली, हे अद्‍याप समजू शकलेलं नाही. दरम्‍यान, रविवारी पंजाबच्‍या टीमने चेन्‍नईसारख्‍या स्‍ट्राँग टीमने चार धावांनी पराभूत करून दुसरी विजय मिळवला. ख्रिस गेलच्‍या तुफानी ६३ धावांच्या जोरावर पंजाबने चेन्नईसमोर १९७ धावांचे आव्‍हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. यावेली फिनिशर धोनीचा षटकार चेन्नईला पराभवापासून वाचवू शकला नाही. पंजाबची टीम यंदा चांगलीच फॉर्ममध्ये आहे. के एल राहुल, करुण नायर, युवराज सिंग आणि मयंक अग्रवाल यासारख्या खेळाडूंमुळे पंजाबची ताकद वाढली आहे. अश्विनच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ आपला दबदबा असाच कायम ठेवणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 

Tags : iplt20-11, ipl 2018, actress preity zinta, angry, csk vs kings xi punjab