Sun, Nov 17, 2019 08:01होमपेज › Sports › नोव्हाक जोकोव्हिच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत 

नोव्हाक जोकोव्हिच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत 

Published On: Jul 12 2019 9:14PM | Last Updated: Jul 12 2019 9:14PM
लंडन : पुढारी ऑनलाईन 

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने लौकिकास साजेसा खेळ करताना विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अग्रमानांकित जोकोव्हिचने २३ व्या मानांकित रॉबर्टो ब्युटीस्टा अगुटला ६-२, ४-६, ६-३, ६-२ अशा सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली.  

पहिला सहजरित्या खिशात घातल्यानंतर रॉबर्टोने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार मुसंडी मारताना सामन्यात पुनरागमन केले. तिसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने रॉबर्टोचे आव्हान परतावून लावताना आक्रमक खेळ केला. पुढील दोन्ही सेट त्याने एकतर्फी जिंकून रॉबर्टोला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. 

अंतिम फेरीमध्ये त्याची लढत स्पेनच्या रॅफेल नदाल  किंवा स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररशी होईल. त्यामुळे दोघांपैकी कोणीही अंतिम सामन्यात प्रवेश केल्यास सामन्याची रंगतदार मेजवानी मिळणार आहे. दुसरीकडे बऱ्याच कालखंडानंतर नदाल आणि फेडरर आमने-सामने येतील. त्यामुळे हा सामना फायनल पुर्वीची फायनल असणार आहे.