Fri, Jul 19, 2019 16:02होमपेज › Sports › विराट कोहलीला परिपक्‍व होण्याची गरज : गावसकर

विराट कोहलीला परिपक्‍व होण्याची गरज : गावसकर

Published On: Sep 15 2018 1:51AM | Last Updated: Sep 14 2018 10:47PMमुंबई : वृत्तसंस्था

 इंग्लंडमधील दारुण पराभवानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका करताना, कोहलीला व्यूहरचनेच्या बाबतीत बरेच शिकायची आवश्यकता आहे. सर्वप्रथम त्याने क्षेत्ररक्षण रचना आणि गोलंदाजीतील बदल शिकावे आणि परिपक्‍व कर्णधार व्हावे, असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे.

“दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौर्‍यांनी हे सिद्ध केले की, कोहलीला अजून बरेच शिकायचे आहे. योग्य क्षेत्ररक्षण रचना आणि गोलंदाजीतील बदलांची समयसूचकता यामुळे सामन्याचा निकाल बदलू शकतो. याच गुणाचा कोहलीमध्ये अभाव जाणवला. त्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारून आता दोन वर्षे झाली आहेत,” असे गावसकर यांनी सांगितले.