Mon, Nov 20, 2017 17:22होमपेज › Sports › नॅशनल स्टेडियम कराची, 15 नोव्हेंबर आणि सचिन

नॅशनल स्टेडियम कराची, 15 नोव्हेंबर आणि सचिन

Published On: Nov 15 2017 1:07PM | Last Updated: Nov 15 2017 1:07PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

दिनांक- 15 नोव्हेंबर 1989, स्थळ- नॅशनल स्टेडियम कराची (पाकिस्तान), कसोटी सामना क्रमांक 1127, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना आणि सचिन तेंडुलकर याचे कसोटी क्रिकेटमधील पदार्पण...

आजच्या दिवशी 28 वर्षांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वयाच्या 16व्या वर्षी सचिनने सुरू केलेली ही खेळी पुढे 24 वर्षे सुरू होती. सचिनने 200 कसोटी सामन्यात 53.78च्या सरासरीने 15 हजार 921 धावा केल्या. त्यात 51 शतके आणि 68 अर्धशतकांचा समावेश आहे. 

पहिल्या कसोटी सामन्यात सचिन जेव्हा मैदानात आला तेव्हा भारताची अवस्था चार बाद 41 अशी होती. पाकिस्तानने पहिल्या डावात 409 धावांचा डोंगर उभा केला होता. या सामन्यात सचिनने 24 चेंडूत दोन चौकारांसह 15 धावा केल्या.  दुसऱ्या डावात सचिनला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. मात्र या सामन्यात त्याने 1 ओव्हर टाकली होती. भारतीय दमदार फलंदाजी केल्यामुळे  हा सामना अनिर्णित झाला. या सामन्यात पाकिस्तानकडून वकार यूनूसने पदार्पण केले होते.