Tue, Feb 20, 2018 09:12होमपेज › Sports › भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ७३ धावांनी विजय, मालिकाही खिशात

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर मालिका विजय

Published On: Feb 13 2018 4:30PM | Last Updated: Feb 14 2018 12:14AMपोर्ट एलिझाबेथ : पुढारी ऑनलाईन 

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या पाचव्या वन-डे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७३ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने सहा सामन्यांची मालिका ४-१ने जिंकली आहे. सहा सामन्यातील एक सामना शिल्‍लक असला तरी, ४ सामने जिंकून भारताने  मालिका खिशात घातली आहे. 

सलामीवीर रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारीत ५० षटकांत ७ बाद २७४ धावा केल्‍या होत्‍या. भारताने दिलेल्‍या २७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ ४२ षटके आणि २ चेंडूत सर्व बाद २०१ धावाच करू शकला.  

 दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्‍या भारताची सुरुवात दमदार झाली. मात्र, आज पुन्हा एकदा मधल्या फळीने निराशा केली. विराट आणि रोहित खेळत असताना भारत जवळपास ६ च्या रनरेटने खेळत होता. पण, ते दोघेही बाद झाल्यावर मधीली फळी कोलमडली. त्यामुळे भारत २७४ धावाच करु शकला. भारताकडून रोहित शर्माने ११५ धावा केल्या. तर शिखर धवन ३४, विराट ३६ आणि श्रेयस अय्यरने ३० धावा केल्या. पांड्या आणि रहाणेने पुन्हा निराशा केली. पांड्या शून्यावर तर रहाणे ८ धावांवर बाद झाला. आफ्रिकेकडून निगिडीने ५१ धावात ४ बळी टिपले.