Mon, Sep 24, 2018 03:01होमपेज › Sports › अखेर ‘हिटमॅनला’ सूर गवसला  

अखेर ‘हिटमॅनला’ सूर गवसला  

Published On: Feb 13 2018 7:13PM | Last Updated: Feb 13 2018 8:21PMपोर्ट एलिझाबेथ : पुढारी ऑनलाईन

भारतातील मालिकेत दमदार फलंदाजी करणारा भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या फलंदाजीला आफ्रिकेत ग्रहण लागले होते. पहिल्या दोन कसोटीत सामन्यात निराशा केल्यानंतर रोहितला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले. त्यानंतर त्याच्या हक्काच्या फॉरमॅटमध्ये म्हणजे वन-डेमध्ये देखील पहिल्या चार सामन्यात त्याने निराशा केली होती. पण, त्याने पाचव्या वन-डेत शतक ठोकून त्याच्या चाहत्यांना दिलासा दिला आहे.

भारतासाठी पाचवी वन-डे महत्वाची आहे. मागच्या सामन्यात भारताचा ऐतिहासिक मालिका विजय हुकला होता. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मोक्याच्या सामन्यात रोहितने  आपल्या कारकिर्दितील  १७ वे शतक ठोकले. त्याने १०६ चेंडूत १० चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले.

SA vs IND Women's T-20 : भारताने पहिली टी-२० जिंकली

SA vs IND Live : भारताची मधली फळी पुन्हा ढेपाळली