Tue, Jan 22, 2019 08:32होमपेज › Sports › बंगळुरुने अव्वल हैदराबादला रोखले, स्पर्धेतील आव्हान कायम

बंगळुरुने अव्वल हैदराबादला रोखले, स्पर्धेतील आव्हान कायम

Published On: May 17 2018 8:15PM | Last Updated: May 18 2018 12:06AMबंगळुरु : पुढारी ऑनलाईन

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरु संघाने हैदराबादला 14 धावांनी पराभूत करत आयपीएल स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. बंगळुरुने दिलेल्या 219 धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादला निर्धारित 20 षटकात 3 बाद 204 धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर शिखर धवन 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर लयीत दिसणारा हेल्सला मोईनने 37 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर कर्णधार विलियमसनने मनिष पांड्यासोबत 135 धावांची भागीदारी केली. यात विलियमसनने  42 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 81 धावा ठोकल्या. अखेरच्या षटकात 20 धावांची गरज असताना सिराजच्या गोलंदाजीवर विलियमसन सीमारेषेवर झेल देवून तंबूत परतला. मनिष पांड्येने 38 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली. यात त्याने 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.     

एबी आणि मोईन खानच्या तुफानी अर्धशतकानंतर अखेरच्या षटकात कॉलिन ग्रोन्हमच्या धमाकेदार फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरुने हैदराबादसमोर 219  धावांचे आव्हान ठेवले होते. नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कोहली आणि पार्थिव पटलेने बंगळुरुच्या डावाला सुरुवात केली. दोघेही स्वस्तात माघारी परतले. पार्थिव पहिल्याच षटकात 1 धावा करुन बाद झाला. त्यानंतर विराटनेही तंबूचा रस्ता पकडला. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि मोईन खानने तिसऱ्या विकेटसाठी 107 धावा करत संघाचा डाव सावरला. ही जोडी बाद झाल्यानंतर कॉलीनने तुफान फटकेबाजी करत 17 चेंडूत  40 धावांची खेळी केली. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तो कौलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर सरफराजच्या नाबाद 22 धावा आणि साऊदीच्या नाबाद 1 धावाच्या जोरावर  बंगळुरुने निर्धारित 20 षटकात 6 बाद 218 धावांचा डोंगर रचला आहे.

प्रथम फंलदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरुची सुरुवा खराब झाली. संदीप शर्माने पहिल्याच षटकात पार्थिव पटेलला चालते केले. तो अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स मैदानात उतरला. विराट कोहलीही अवघ्या 12 धावांवर तंबूचा रस्ता धरला. त्याला राशिद खानने बाद केले. दोन गडी बाद झाल्यानंतरही एबीची आक्रमक अर्धशतकी खेळी करत डाव सावरला. त्याने 39 चेंडूत 69 धावांची तुफानी खेळी केली. त्याने  मोईन खानसोबत तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. राशिदच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका खेळण्याच्या नादात एबी झेलबाद झाला. तो बाद झाल्यानंतर मोईन खाननेही तंबूचा रस्ता धरला. मोईन खानने 34 चेंडूत 65 धावा ठोकल्या. यात 2 चौकार आणि 6 उत्तुंग षटकार खेचले.