Sun, Feb 24, 2019 02:24होमपेज › Sports › रोहित सचिनचा एजंट, नेटकऱ्यांचा 'विराट' राग

रोहित सचिनचा एजंट, नेटकऱ्यांचा 'विराट' राग

Published On: Feb 14 2018 10:29AM | Last Updated: Feb 14 2018 11:26AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

रोहित शर्माचे संयमी शतक आणि कुलदीप आणि चहलच्या फिरकीतील जादूच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाचवा वनडे सामना जिंकून भारताने मालिका खिशात घातली. भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक होत असताना शतकानंतरही नेटकऱ्यांचा रोहितवरील राग कमी झालेलना नाही. यापूर्वी फॉर्म हरवल्यामुळे टिकेचा धनी ठरलेला रोहित शर्मावर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला.   

पाचव्या एकदिवसीय सामन्यात धवन बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारतीय डावाला आकार दिला. ही जोडी मैदानात चांगली जमली आहे,  असे वाटत असताना दोघांच्यातील ताळमेळ न जुळल्याने कोहलीला तंबूचा रस्ता धरावा लागला. कोहली ३६ धावांवर बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रोहित शर्माची शाळा घेतली. काहींनी तर रोहितला थेट मास्टर ब्लास्टर सचिनचा एजंट म्हणून संबोधले. 

Image may contain: text

सचिनच्या शतकांचा विक्रम मोडू नये, म्हणून रोहितने विराटला बाद केले, अशी भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली. क्रिकेटच्या मैदानात सचिन तेंडुलकरच्या नावे १०० शतकांचा विक्रम आहे. कोहलीने आतापर्यंत कसोटी आणि वनडेत मिळून ५५ शतक झळकावली आहेत. सचिनचा विश्वविक्रम फक्त विराटच मोडू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात नेहमीच रंगत असते. एवढेच नाही तर विराटच्या शतकी खेळीने खुद्द सचिनलाही आनंद होतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विराटच्या शतकानंतर सचिनने भारतीय कर्णधाराचे कौतुकही केले होते. मात्र, नेटकऱ्यांनी विराटचे शतक हुकल्याचा राग व्यक्त  रोहितवर राग व्यक्त केला आहे. कोहलीशिवाय अजिंक्य रहाणेदेखील या सामन्यात धावबाद झाला होता. ११५ धावांची संयमी खेळी करणाऱ्या रोहितला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.  

वाचा : नजरेनं घायाळ करणाऱ्या प्रियाविरोधात FIR

वाचा : Valentine special : 'या' प्रेमाला तोड नाही

वाचा :अखेर ‘हिटमॅनला’ सूर गवसला  

No automatic alt text available.