Mon, Jun 17, 2019 10:13होमपेज › Sports › क्रिकेटच्या मैदानात चीनचा मानहानिकारक पराभव 

क्रिकेटच्या मैदानात चीनचा मानहानिकारक पराभव 

Published On: Oct 12 2018 3:02PM | Last Updated: Oct 12 2018 3:07PMक्वालालांपूर : पुढारी ऑनलाईन 

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जोरदार कामगिरी करणाऱ्या चीनची क्रीडा जगतात वाहवा झाली होती. पण आशिया खंडात प्रसिध्द असलेल्या क्रिकेटमध्ये या चीनची अवस्था फारच वाईट आहे. नुकत्याच झालेल्या आयसीसी टी-२० आशिया पात्रता फेरीत नेपाळसारख्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने फारच किरकोळ असणाऱ्या देशाने चीनची क्रिकेटच्या मैदानात मानहानी केली. 

पात्रता फेरीतील ग्रुप ब मधील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चीनला अवघ्या २६ धावा करता आल्या. १३ षटके खेळलल्या चीनच्या हाँग जीन यान याने फक्त दुहेरी (११) धावसंख्या ओलांडली. चीनच्या ७ फलंदजांना भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर नेपाळने हे २५ धावांचे आव्हान अवघ्या १.५ षटकात म्हणजे ११ चेंडूत पार करत ब गटात संयुक्तरित्या अव्वल स्थान पटलावले. 

नेपाळचा गोलंदाज संदीप लामिचाने जो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सलडून खेळतो त्याने ४ षटकात ४ धावा देत चीनचे ३ फलंदाज बाद केले.