Mon, Dec 09, 2019 18:55होमपेज › Sports › मोहसीन खान यांचा पीसीबी क्रिकेट समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

मोहसीन खान यांचा पीसीबी क्रिकेट समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

Published On: Jun 20 2019 10:31PM | Last Updated: Jun 21 2019 1:11AM
कराची : वृत्तसंस्था 

माजी कसोटीपटू असलेल्या मोहसीन खानने पकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) क्रिकेट समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या समितीला विश्‍वचषकासह गेल्या तीन वर्षांतील पाकिस्तानच्या कामगिरीचा आढावा घ्यायचा होता.

आपल्या पदावरून मुक्तकरावे, असे निवेदन मोहसीन खान यांनी पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी यांना दिले आहे. आता या समितीचे नेतृत्व वसीम खान करतील. वसीम हे  बोर्डाचे प्रबंध निदेशक आहेत. या समितीची स्थापना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती; पण ती कार्यरत नव्हती. आयसीसी विश्‍वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली होती.

मोहसीनसारख्या व्यक्तीच्या जाण्यामुळे अडचणी निर्माण होतात. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो व भविष्यातील त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असे मनी म्हणाले. मोहसीन या पदावरून पायउतार झाल्यानंतर विश्‍वचषक स्पर्धेनंतर त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

नजम सेठींचे पीसीबीच्या व्यवस्थापनावर ताशेरे संघाच्या विश्‍वचषकातील खराब कामगिरीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापन जबाबदार असल्याचे नजम सेठी यांनी म्हटले. संघाच्या विश्‍वचषकातील कामगिरीमुळे सर्वजण निराश झाले आहेत. व्यवस्थापनेने संघाला म्हणावा तसा पाठिंबा दिला नाही, असे सेठी म्हणाले. संघातील कर्णधार, प्रशिक्षकांसह काही खेळाडूंमध्ये देखील असुरक्षेची भावना असल्याचे मला सूत्रांकडून कळाले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच संघातील खेळाडूंना स्पर्धा संपल्यानंतर काय होईल याची चिंता होती, असे सेठी यांनी सांगितले.