Sun, Feb 24, 2019 02:50होमपेज › Sports › Video : विराटच्या स्लेजिंगमुळे 'त्याने' मैदान सोडले

Video : विराटच्या स्लेजिंगमुळे 'त्याने' मैदान सोडले

Published On: Feb 15 2018 7:47AM | Last Updated: Feb 15 2018 7:46AMपोर्ट एलिझाबेथ : पुढारी ऑनलाईन 

भारतीय कर्णधार विराट कोहली फलंदाजीतील फटकेबाजीशिवाय मैदानातील आक्रमक तेवर दाखवण्यातही तरबेज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत कोहलीचा हा अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एकेकाळी ऑस्ट्रेलियन कर्णधार प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला डिवचायचा अगदी त्याचप्रकारे कोहलीने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला आक्रमक फटका खेळण्यासाठी मजबूर केले. विशेष म्हणजे त्याने विकेट गमावल्यामुळे कोहलीचा उद्देश साध्य झाला आणि कुलदीपच्या खात्यात कर्णधारामुळे एका विकेटची भर पडली.  

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ४१.४ षटकांचा खेळ झाल्यानंतर कोहलीने मैदानात उतरलेल्या तबरेझ शम्सीला स्लेजिंग केले. यावेळी दक्षिण आफ्रिकेने  ८ बाद १९७ धावा केल्या होत्या. भारतीय संघ ऐतिहासिक विजयापासून केवळ दोन पावले दूर असताना तबरेझ शम्सी मैदानात उतरला.  कोहलीने शम्सीला उद्देशून म्हटले की, चेस्ट पॅड शम्मो (शम्सी) चेस्ट पॅड बांधले नाहीस का? कोहलीला प्रत्त्युत्तर देण्याच्या नादात शम्सी उत्तुंग फटका खेळला खरा पण हा प्रयत्न फसल्यामुळे त्याला झेलबाद होऊन तंबूत परतावे लागले. या सामन्यात एबी डिव्हिलियर्स आणि हाशिम आमला यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेणाऱ्या  हार्दिक पांड्याने त्याचा सीमारेषेवर अप्रतिम झेल टिपला. आयपीएलच्या स्पर्धेत तबरेझ शम्सी विराटच्या नेतृत्वाखाली बेंगळुरु रॉयल्स संघातून खेळला आहे.

आपल्या आक्रमक फलंदाजीसोबत कोहलीचा मैदानावरील आक्रमक अंदाज अनेकदा पाहायला मिळतो. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज बाद झाल्यानंतर कोहलीचे सेलिब्रेशन हे त्याने शतक ठोकल्यानंतर आनंद व्यक्त करण्याइतकेच आनंददायी असते. भारतीय संघाची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु असताना त्याचे तेवर खरंच पाहण्याजोगे असते.  पोर्ट एलिझाबेथच्या मैदानात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत ६ सामन्यांच्या मालिकेत ४-१ अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली. दोन संघातील अंतिम सामना शुक्रवारी सेंच्युरियनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.