Wed, Feb 20, 2019 14:46होमपेज › Sports › IND vs WI: दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

Published On: Oct 11 2018 3:06PM | Last Updated: Oct 11 2018 3:06PMहैदराबाद: पुढारी ऑनलाईन

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यासाठी मयंक अग्रवाल याला संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण निवड समितीने त्याच्या ऐवजी के.एल.राहुल यावरच विश्वास ठेवला आहे. इंग्लंड दौऱ्या पाठोपाठ पहिल्या कसोटीत राहुलने खराब कामगिरी केल्यामुळे अशी चर्चा होती की मयंकला दुसऱ्या कसोटीत संधी मिळेल. 

जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरचा 12वा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. अर्थात अंतिम 11 जणांमध्ये त्याचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या मयंक अग्रवालचे डिसेंबरमधील ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने शतक साजरे करत आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली होती. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात देखील सर्वांच्या नजरा पृथ्वीवर असतील. 

असा आहे भारतीय संघः विराट कोहली (कर्णधार), के.एल.राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर