Sun, Mar 24, 2019 02:34होमपेज › Sports › आयपीएलचे भन्नाट थीम साँग पाहिले का? (Video)

आयपीएलचे भन्नाट थीम साँग पाहिले का? (Video)

Published On: Mar 13 2018 10:09AM | Last Updated: Mar 13 2018 10:14AM नवी दिल्ली :  पुढारी ऑनलाईन

क्रिकेट प्रेमी  इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) ११ व्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता लक्षात घेत या स्पर्धेसाठी 'बेस्ट वर्सेस बेस्ट' नावाच्या शिर्षकाखाली खास साँग तयार केले आहे. सोमवारी हे साँग लॉन्च करण्यात आले. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि  चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सलामीच्या लढतीने ७ एप्रिलपासून क्रिकेटच्या मैदानातील आयपीएलचा थरार रंगणार आहे.  

भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) आणि स्टार इंडियाने संयुक्तरित्या आयपीएलचे थीम साँग तयार केले आहे. ' ये देश है शेर जवानों का.. इस आयपीएल का यारों क्या कहना! असे गाण्याचे बोल असून 'ये देश है वीर जवानों का' या गाण्याच्या चालीवर असणारे गाणे सर्वांना थिरकायला लावणारे असेच आहे. हे गाणे हिंदीसह तमिळ, बंगाली, कन्नड आणि तेलगू अशा पाच भाषेत लॉन्च करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे चित्रपट दिग्दर्शक डेन मेस, संगीतकार राजीव वी. भल्ला आणि गायक सिद्धार्थ बाररुर यांनी मेहनत घेतली आहे.

आयपीएल स्पर्धेत  क्रिकेट चाहत्यांना नेहमीच  बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळते. यंदाच्या स्पर्धेत देखील त्याची अनुभूती येईळ, असे मत बीसीसीआयचे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल जौहरी यांनी कार्यक्रमात व्यक्त केले.