Fri, Mar 22, 2019 03:51
    ब्रेकिंग    होमपेज › Sports › चिअरगर्ल्स म्हणाल्या, एबी पिया अब तो आजा!

चिअरगर्ल्स म्हणाल्या, एबी पिया अब तो आजा!

Published On: May 17 2018 9:14PM | Last Updated: May 17 2018 9:14PMबंगळुरु : पुढारी ऑनलाईन

आयपीएल स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याच्या इराद्याने बंगळुरुचा संघ मैदानात उतरला आहे. सलामीवीर पार्थिव पटेल स्वस्तात माघारी परतल्यानंतर एबी डिव्हिलियर्सने मैदानात एन्ट्री केली. एबीची धमाकेदार खेळी पाहण्यासाठी प्रत्येक चाहता उत्सुक असतो. बंगळुरुच्या मैदानात एबीच्या खेळीची अनोखी आतूरता पाहायला मिळाली. चेअर गर्ल्सनी 'पिया तू AB तो आजा...' अशी फलकबाजी करत एबीची धमाकेदार खेळी पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दाखवून दिले. 

Image may contain: 1 person, smiling, text

विराट कोहली 12 धावांवर परतल्यानंतर एबीने मोईन खानसोबत बंगळुरुचा डावा सावरला. आपल्या भात्यातील अफलातून फटकेबाजीने त्याने संघाला सुस्थिती पोहचवले. चिअर गर्ल्संना आपली प्रतिक्षा का लागून राहिली होती, याचा नमुनाच एबीने आपल्या खेळीतून दाखवून दिला. एबी डिव्हिलियर्सने 39 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 69 धावांची तुफान खेळी केली. दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर त्याने बंगळुरुचा डाव सावरला. राशिद खानच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. शिखर धवनने सीमारेषवर त्याचा अप्रतिम झेल टिपला. पण, तोपर्यंत एबीने आपली भूमिका चोख पार पाडली होती.

Image result for ab de villiers