Fri, Mar 22, 2019 03:11
    ब्रेकिंग    होमपेज › Sports › मुंबई प्ले-ऑफ ‘रेस’मध्ये कायम

मुंबई प्ले-ऑफ ‘रेस’मध्ये कायम

Published On: May 16 2018 7:32PM | Last Updated: May 17 2018 12:43AMमुंबई : क्रीडा प्रतिनिधी

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर 3 धावांनी रोमांचक विजय मिळवून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 11 व्या सत्राच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 186 धावा करताना पंजाबला 5 बाद 183 धावांवर रोखले. मुुंबईच्या विजयामुळे प्ले-ऑफची शर्यत आणखी रंगतदार बनली आहे. के. एल. राहुलची 94 धावांची खेळी व्यर्थ ठरली.

187 धावांचा पाठलाग करताना राहुल व गेल (18) यांनी 34 धावांची सलामी दिली. त्यानंतर राहुल व फिंच यांनी 10 व्या षटकात दुसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पंजाबला शेवटच्या 36 चेंडूत विजयासाठी 66 धावांची गरज होती. या जोडीने 72 चेंडूत शतकी भागीदारी पूर्ण केली. मात्र, याचवेळी षटकार खेचण्याच्या प्रयत्नात फिंच 46 धावांवर झेलबाद झाला. पाठोपाठ स्टोइनिसही 1 धाव काढून बाद झाला. 

9 चेंडूत 20 धावांची गरज असताना राहुल 94 धावांवर सीमारेषेवर झेल देऊन बाद झाला. राहुलने 60 चेंडूत 10 चौकार 3 षटकार खेचले. शेवटच्या षटकात पंजाबला 17 धावांची गरज होती. मात्र, युवराज (1) मोक्याच्या क्षणी बाद झाला आणि पंजाबला 5 बाद  183 धावाच करता आल्या. 

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 8 विकेट गमावून 186 धावा काढल्या. सूर्यकुमार यादव व लेविस यांनी तीन षटकांत 37 धावांचा पाऊस पाडला. मात्र, याच वेळी लेविस 9 धावांवर परतला. सूर्यकुमार यादवलाही (27) टायने झेलबाद करून मुंबईची अवस्था 3 बाद 59 अशी बिकट केली.

कर्णधार रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. त्याला 6 धावांवर युवीकरवी झेलबाद करून अंकित राजपूतने मुंबईची अवस्था 4 बाद 74 अशी केली. मात्र, त्यानंतर पोलार्डने फटकेबाजी करत 23 चेंडूत पाच चौकार व तीन षटकारांसह 50 धावांची खेळी करून मुंबईला सावरले. कुणाल पंड्या (32), हार्दिक पंड्या (9), मॅक्‍लेनघन (नाबाद 11) यांनी हाणामारीच्या षटकांत फटकेबाजी करून मुंबईला 8 बाद 186 धावा, अशी स्थिती प्राप्‍त करून दिली. पंजाबच्या टायने 16 धावांत 4 विकेट घेतल्या.

संक्षिप्‍त धावफलक :
मुंबई : 20 षटकात 8 बाद 186 धावा. (सूर्यकुमार 27, किशन 20, कुणाल 32, पोलार्ड 50, टाय 14 धावात 4 विकेट.)
पंजाब  : 20 षटकात 5 बाद 183 धावा. (राहुल 94, गेल 18, फिंच 46, बुमराह 15 धावांत 3 विकेट.)

                   संघ             लढती    विजय    पराजय    ड्रॉ    रनरेट    गुण

  1. सनरायझर्स          12           9             3        0       +0.40    18
  2. चेन्‍नई सु. किंग्ज    12           8             4        0       +0.38    16
  3. नाईट रायडर्स       13           7             6        0       -0.09    14
  4. मुंबई इंडियन्स      13           6             7        0       +0.38    12
  5. राजस्थान रॉयल्स   13           6             7        0       -0.39    12
  6. किंग्ज पंजाब        13            6             7       0      -0.49    12
  7. रॉयल चॅलेंजर्स      12            5             7       0      +0.21    10
  8. डेअरडेव्हिल्स       12            3             9       0       -0.47    6