Wed, Jun 19, 2019 08:09होमपेज › Sports › चेसच्या खेळीने विंडीजची त्रिशतकाकडे वाटचाल

चेसच्या खेळीने विंडीजची त्रिशतकाकडे वाटचाल

Published On: Oct 12 2018 9:29AM | Last Updated: Oct 12 2018 5:17PMहैदराबाद : पुढारी ऑनलाईन 

हैदराबाद येथे खळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत  विंडीजने दिवस अखेर ७ बाद २९५ धावा केल्या. रोस्टन चेसच्या जिगरबाज खेळीने विंडीज आपल्या पहिल्या डावात ३०० धावांच्या जवळपास पोहचला आहे. चेसने नाबाद ९८ धावा केल्या आहेत. त्याला कर्णधार होल्डरने ५२ धावा करुन चांगली साथ दिली. चेसला त्याचे कसोटीतील चौथे शतक पूर्ण करण्यासाठी फक्त दोन धावांची गरज आहे. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजच्या संघाला याही सामन्यात चांगली सुरुवात करता आली नाही. सलामीला आलेल्या ब्रेथवेट आणि पॉवेल यांनी अवघ्या ३२ धावांची सलामी दिली. पदार्पण करणारा जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला त्याच्या दुसऱ्याच षटकात जायबंदी झाल्याने मैदान सोडावे लागले.  त्यामुळे फिरकी गोलंदाज अश्विनला गोलंदाजीस लवकर पाचारण करण्यात आले. 

अश्विनने कर्णधाराला निराश न करता सलामीवीर पॉवेलला २२ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर गोलंदाजीस आलेल्या कुलदीप यादवने दुसरा सलामीवीर ब्रेथवेटला पायचीत पकडले. ५२ धावांवर विंडीजचे दोन फलंदाज माघारी गेले. त्यानंतर आलेल्या होप आणि हेटमेयर विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, संघाची धावसंख्या ८६वर पोहचली असताना होपला उमेश यादवने पायचीत पकडले आणि उपहाराला जाण्यापूर्वी विंडीजला अजून एक धक्का दिला.  

उपहारापर्यंत विंडीजने आपले तीन फलंदाज गमावले होते. उपहारानंतर फलंदाजीस आलेल्या हेटमायर आणि अमरीश हे फलंदाजीस आले. पण त्यांचाही भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. हेटमयरला १२ धावांवर असताना कुलदीप यादवने पायचीत पकडले. सुनिल अमरीशही कुलदीपच्या जादुई गोलंदाजी समोर टिकव लागला नाही. तोही १८ धावा मरुन माघारी परतला. कुलदीप यादवाच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पोहचला. 

विंडीजचा निम्मा संघ माघारी गेल्यावर आलेल्या चेस आणि डोवरिचने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ६९ धावांची भागिदारी केली. ही सेट जोडी विंडीजला २०० धावांचा टप्पा पार करुन देणार असे वाटत असतानाच उमेश यादवने रिव्हर्स स्विंग करत डोवरिचला पायचीत पकडले. त्याने ३० धावा केल्या. डोवरिच बाद झल्यावर कर्णधार जेसन होल्डर फलंदाजीस आला. दरम्यान, चेसने आपले अर्धशतक पूर्ण केले. चहापानापर्यंत विंडीजच्या ६ बाद १९७ धावा झल्या होत्या. 

चाहापानानंतर परत फलंदाजीला आलेल्या चेस आणि कर्णधार जेसन होल्डरने भारतीय गोलंदाजीचा नेटाने मुकाबला करत पडझड रोखली. त्याचबरोबर त्यांनी विंडीजची धावसंख्याही वाढवण्यास सुरुवात केली. जेसन होल्डरने चेसचा चांगली साथ देत अर्धशतकी खेळी केली. दरम्यान, रोस्टन चेस देखील आपल्या शतकाच्या जवळ पोहचला. या दोघांनी ७ च्या विकेटसाठी १०० धावांची भागिदारी केली. पण, होल्डरला मोठी खेळी करता आली नाही. होल्डरचा अडसर उमेश यादवने दूर केला. त्यानंतर विंडीजच्या धावगतीवर थोडा अंकूश आला. त्यामुळे दिवस अखेर विंडीजला ७ बाद २९५ धावा करता आल्या. 

दरम्यान, भारताकडून दोन यादवांनी चांगली गोलंदाजी करत प्रत्येकी ३ बळी मिळवले. कुलदीप यादवने २६ षटकात ७४ धावा देत ३ बळी मिळवले तर उमेश यादवने २३ षटकात ८३ धावा देत ३ बळी मिळवले. अश्विनने २४.२ षटकात १ बळी मिळवला.