Mon, Jun 17, 2019 10:04होमपेज › Sports › हैदराबाद स्टेडियमची सुरक्षा यंत्रणा चव्हाट्यावर; फॅन पोहचला विराटपर्यंत 

हैदराबाद स्टेडियमची सुरक्षा यंत्रणा चव्हाट्यावर; फॅन पोहचला विराटपर्यंत 

Published On: Oct 12 2018 12:15PM | Last Updated: Oct 12 2018 1:06PMहैदाराबाद : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान पुन्हा एकदा मैदानावरील सुरक्षा यंत्रणेला आव्हान मिळाले आहे. वेस्ट इंडीजची फलंदाजी सुरु  होती. सामन्याचे १५ वे षटक सुरु असताना विराट कोहलीचा एका चाहत्याने सुरक्षा घेरा तोडून मैदानात प्रवेश केला. 

शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या विराटबरोबर सेल्फी काढण्याचा मोह त्याच्या चाहत्याला आवरता आला नाही. त्या चाहत्याने सामना संपण्याची वाट न बघता १५ षटकानंतर चक्क खेळपट्टीकडे धाव घेतली. तो शॉर्ट लेगला उभारलेल्या विराट कोहलीपर्यंत पोहचला आणि त्याने विराटला चक्क मिठीच मारली. या अनपेक्षित घटनेमुळे विराट कोहली बावरला. 

अशाच प्रकारे राजकोट कसोटीदरम्यान विराट फलंदाजी करत असताना दोन चाहत्यांनी मैदानात येत त्याच्या सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला होते. यामुळे मैदानावरच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असाच काहीसा प्रकार रणजी सामन्यातही झाला होता. त्यावेळी चक्क एका चाहत्याने कारच मैदानावर घातली होती.