Sat, Sep 21, 2019 05:51होमपेज › Sports › क्रिकेट समालोचकाचे वरुण राजा ऐवजी इंद्र देवाला पत्र!

क्रिकेट समालोचकाचे वरुण राजा ऐवजी इंद्र देवाला पत्र!

Published On: Jun 13 2019 5:30PM | Last Updated: Jun 13 2019 5:37PM
नॉटिंगहॅम : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिजवर होत असलेल्या सामन्यावर वरुण राजाने आपली अवकृपा करण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये अपराजित राहिले आहेत. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या दोन संघातील सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतुर झाले होते. पण, पावसामुळे साधा टॉसही होवू शकलेला नाही.

यामुळे भारतीय क्रिकेट फॅन्स आकाशाकडे डोळे लावून वरूण देवाला आपली नको तिथे झालेली कृपा बंद करण्यासाठी अर्ज विनंत्या करत असतील. अशीच एक विनंती वजा पत्र क्रीडा वाहिनीवरील क्रिकेट समालोचक गौरव कपूर यांनी केली आहे. पण, बहुदा त्यांनी चुकीच्या पत्त्यावर पत्र पाठवल्यामुळे पाऊस थांबण्यास अजून उशीर होण्याची शक्यता आहे. त्यांनी वरूण राजाला पत्र लिहिण्याऐवजी इंद्र देवालाच पत्र लिहिले आहे.

गौरव कपूर यांनी नॉटिंगहॅमवर होत असलेल्या जोरदार पावसामुळे सामन्याला उशीर होत असल्याने ट्विटरवरुन इंद्रदेवाला पत्र लिहिले आहे. त्यांनी ‘ विषय - ड्राय डे, हे इंद्र देवा ( नॉटिंगहॅम शाखा ) तुम्ही गेल्या काही दिवसांपासून ओव्हर टाईम करत आहात. पण, आज जरा सुट्टी घ्या. तुमचाच भारतीय क्रिकेट फॅन.’ असे ट्विट केले आहे. बहुदा गौरव कपूर यांनी गडबडीत वरूणराजाला विनंती करण्याऐवजी इंद्र देवाला विनंती केली आहे. 

गौरव कपूर यांच्याप्रमाणे भारताचा माजी ऑफस्पिनर हरभज सिंगनेही ट्विटरवरुन नॉटिंगहॅममधील पावसाचे अपडेट दिले आहेत. त्याच्या मते हा सामना ना भारत जिंकणार आहे ना न्यूझीलंड हा सामना पाऊस जिंकणार आहे.