होमपेज › Sports › INDvsAFG :सालामीवीरांच्या दोन शतकानंतरही अफगाणच भारी 

INDvsAFG : सालामीवीरांच्या दोन शतकानंतरही अफगाणच भारी 

Published On: Jun 14 2018 9:46AM | Last Updated: Jun 14 2018 6:55PMबेंगळुरु : पुढरी ऑनलाईन 

अफगाणिस्तान बरोबरच्या पहिल्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताला. भारताने या कसोटीसाठी बेंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर जशी असते तशी खेळपट्टी न देता ग्रीन टॉप दिला. भारत  कसोटीकडे इंग्लंड दौऱ्याची तयारी असेच बघत आहे. पण, अफगाण गोलंदाजांनी लंच नंतर जोरदार धक्के देत भारताचे ६ फलंदाज पॅव्हेलियन मध्ये धाडले. 

सलामीला आलेल्या शिखर धवन आणि मुरली विजय यांनी फलंदाजीचा चांगलाच सराव करुन घेतला. शिखर धवनने आक्रमक फलंदाजी करत ९६ चेंडूत १०७ धावा केल्या. तो बाद झाल्यावर आक्रमणाची जबाबदारी मुरली विजयने घेत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने १५३ चेंडूत १०५ धावा केल्या. त्याला राहुल आणि पुजाराने चांगली साथ दिली. भारत पहिल्याच दिवशी ४०० धावांच्या वर धावा करणार असे वाटत असतानाच अफगाण गोलंदाजांनी भारताला धक्के देण्यास सुरुवात केली. 

सेट झालेल्या राहुल आणि पुजाराला बाद करत अफगाणी गोलंदाजांनी भारताला अडचणीत आणले. भारताचा कर्णधार रहाणेला राशिद खानने १० धावांवर माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या कार्तिक धावबाद झाला. तीन बाद २८४ वरुन दिवस अखेर ६ बाद ३३४ अशी अवस्था झाली. 

भारताने जरी पहिल्या सत्रात वर्चस्व राखले असले तरी अफगाण गोलंदाजांनी पहिल्या दिवसाची शेवटची सत्रे आपल्या नावावर केली. 

अपडेट : 

*भारताच्या .दिवस अखेर ६ बाद ३३४ धावा  

६० षटकांत भारताच्या ३ बाद ३०४ धावा; अजिंक्य रहाणे ५ धावांवर तर चेतेश्वर पुजारा २१ धावांवर नाबाद

केएल राहूल ५४ धावांवर बाद; भारताच्या ३ बाद २८४ धावा

मुरली विजय १०५ धावांवर बाद; भारत २ बाद २८०

पुन्‍हा पाऊस सुरू झाल्याने दुसर्‍यांदा खेळ थांबवला

पावसाच्या व्यत्ययानंतर सामना पुन्‍हा सुरू, भारत ४६.४ षटकांत १ बाद २५८ धावा, केएल राहुल ४१ धावांवर खेळत आहे. 

बंगळूरमध्ये पावसामुळे सामना थांबवला; भारत ४५.१ षटकांत १ बाद २४८ धावा

भारताचा दुसरा सलामीवीर मुरली विजयचे कसोटी क्रिकेटमधील १६ वे अर्धशतक

 

शिखर धवन यामिद अहमदझईच्या गोलंदाजीवर १०७ धावा करून झेलबाद

अफगाणिस्‍तानचा कसोटी क्रिकेटमधील शिखर धवन पहिला बळी

शिखर धवनचे कसोटी कारकिर्दीतील ७ वे शतक

भारत २६.३ षटकांत बिनबाद १५८ धावा, शिखर धवन ८८ चेंडूत १०४, मुरली विजय ७२ चेंडूत ४१ धावा

अफगाणिस्‍तान विरूद्ध भारताचा सलामीवर शिखर धवनची नाबाद शतकी खेळी

भारताचा सलामीवीर शिखर धवनचे ४७ चेंडूत अर्धशतक, भारत बिनबाद ७५ धावा

शिखर धवनचे कसोटी क्रिकेटमधील ६ वे अर्धशतक

भारत व अफगाण संघ