Mon, Jun 17, 2019 10:05होमपेज › Sports › Pro kabaddi : सामन्याच्या आधीच हरियाणाला धक्का

Pro kabaddi : सामन्याच्या आधीच हरियाणाला धक्का

Published On: Oct 12 2018 5:32PM | Last Updated: Oct 12 2018 5:44PMसोनीपत : पुढारी ऑनलाईन

हरियाणा स्टीलर्सला आज आपल्या घरच्या मैदानावर होणाऱ्या पहिल्या सामन्याच्या आधीच मोठा धक्का बसला आहे. हरियाणा संघाच्या कर्णधाराबरोबरच त्यांचे दोन खेळाडू सामन्याआधीच जखमी झाले आहेत. कर्णधार सुरेंद्र नाडा, उप कर्णधार वजीर सिंह आणि नीरज कुमार हे तीघे जण जखमी असल्याने हरियाणाला मोठा धक्का बसणार आहे.  

कर्णधार नाडा जखमी असल्याने या सामन्यात हरियाणा संघाची धुरा या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मोनू गोयल याच्यावर असणार आहे. या सामन्यात मोनू हरियाणा संघाची धुरा कशाप्रकारे पेलणार याकडे आता चाहत्याचे लक्ष राहणार आहे. 

कर्णधार सुरेंद्र नाडा व नीरज संपूर्ण हंगाम खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तर उपकर्णधार वजीर सिंह हा एक आठवडा मैदाना बाहेर राहणार आहे. 

हरियाणा स्टीलर्सचे प्रशिक्षक रामबीर सिंह खोखर यांनी सांगितले की, सुरेंद्र नाडा याच्या जागी नवीन तर नीरजच्या जागी सुधांशु त्यागी खेळणार आहेत. हरियाणा संघ चांगली कामगिरी करत असला तरी सुरेंद्र नाडाची संघाला कमी जाणवणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मात्र हरियाणा संघ या हंगामात चांगली कामगिरी करत विजेता बनेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.