Sun, Oct 21, 2018 20:29होमपेज › Sports › Video : अन् हार्दिक पांड्या झाला पंजाबचा! 

Video : अन् हार्दिक पांड्या झाला पंजाबचा! 

Published On: May 17 2018 8:33PM | Last Updated: May 17 2018 8:47PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

वानखेडेच्या मैदानावर झालेल्या रोमहर्षक लढतीत मुंबई इंडियन्सने पंजाबविरुद्धचा सामना अवघ्या 3 धावांनी जिंकत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. या सामन्यात मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने 96 धावांची धमाकेदार खेळी केली. पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. शेवटपर्यंत झालेल्या रोमहर्षक सामन्यानंतर वानखेडेच्या मैदानावर लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्यांनी खेळाच्या मैदानात खिलाडूवृत्तीचे अनोखा नजराणा सादर केला. 

 

फुटबॉलच्या मैदानातील इर्शेनंतर अनेकदा दोन्ही संघातील खेळाडूंत टिशर्ट एक्सेंज करुन एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची परंपरा पाहायला मिळते. अगदी त्याचप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात  फुटबॉलच्या मैदानातील परंपरा चाहत्यांना अनुभवायला मिळाली. मुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि पंजाबचा सलामीवर लोकेश राहुल या दोघांनी सामन्यानंतर एकमेकांची जर्सी बदलली. जर्सी एक्सेंज करण्याबाबत राहुल म्हणाला की, हार्दिक आणि मी चांगले मित्र आहोत. आम्ही दोघांनीही ही घटना प्लॅन केली नव्हती. सामना संपल्यानंतर मी हार्दिकडे त्याची जर्सी मागितली. त्यावेळी हार्दिकने त्याची जर्सी देत माझी जर्सी घातली. यातून नकळतपणेच फुटबॉलची पंरपरा क्रिकेटच्या मैदानात जपली गेली, असे राहुलने सामन्यानंतर सांगितले.