Mon, Jul 22, 2019 14:11होमपेज › Sports › अँन्डरसनच्या भेदक माऱ्याला टीम इंडिया शरण

अँन्डरसनच्या भेदक माऱ्याला टीम इंडिया शरण

Published On: Aug 10 2018 3:33PM | Last Updated: Aug 11 2018 1:29AMलंडन : पुढारी ऑनलाईन 

इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा धूव्वा उडवत पहिला डाव अवघ्या १०७ धावांवर गुंडाळला. अँडरसनने भारताच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताचे पाच फलंदाज दुहेरी आकडाही पार करु शकले नाहीत. भारताकडून आर. अश्विनने सर्वाधिक २९ धावा केल्या. त्यामुलेच भारत १०० धावा तरी करू शकला.

दुसऱ्या कसोटीत पहिला दिवस पावासमुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकून इंग्लंडने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. कालच्या पावासमुळे खेळपट्टी थोडीशी ओलसर असल्याचा फायदा इंग्लिश गोलंदाजांनी भारताला पहिल्या षटकापासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अँडरसनने मुरली विजयचा त्रिफळा उडवला.

विजय बाद झाला त्यावेळी भारताची धावफलकावर एकही धाव झाली नव्हती. त्यानंतर अॅंडरसनने लगेचच विकेटकिपर बेअरिस्टोकरवी राहुलला झेलबाद करत भारताचा दुसरा सलामीवीरही माघारी धाडला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध पवित्रा घेत चेंडू खेळून काढण्यावर भर दिला. पुजाराने तर २५ चेंडू खेळून अवघी एक धाव केली होती. दरम्यान एक चोरटी धाव घेण्याच्या नादात पुजारा धावबाद झाला. पुजारा बाद झाला त्यावेळी भारताची अवस्था ८ षटकात ३ बाद १५ अशी झाली होती. भारताचा पुढाचा फलंदाज मैदानात येणार तोच पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने खेळ थांबवण्यात आला.

पाऊस थांबल्यावर भारताचा कर्णधात आणि उपकर्णधार दोघे मैदानात आले. दोघांनीही संयमी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत भारताची पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. हे दोघे भारताचे अर्धशतक धावफलकावर लावणार असे वाटत असतानाच ख्रिस वोक्सने भारताला चौथा धक्का दिला. त्याने विराटला २३ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने दोन चौकार मारत आक्रमक सुरुवात केली पण, ही त्याची आक्रमकता आत्मघातकी ठरली. तो १० चेंडूत ११ धावा करुन माघारी परतला. भारतची अवस्था ५ बाद ६१ अशी बिकट झाली. त्यातच कार्तिकही १ धावेची भर घालून माघारी परतला आणि भारताचा पाय अजूनच खोलात गेला. यानंतर अजिंक्य रहाणेही १८ धावांवर अँडरसनच्या एका उत्कृष्ट चेंडूवर झेलबाद झाला. 

दरम्यान, आर अश्विनने एकाकी किल्ला लढवत  भारताला १०० धावांजवळ नेले.  त्याने २९ धावा केल्या. अश्विन बाद झाल्यावर शामीने दोन चौकार मारत भारताला १०७ धावांपर्यंत पोहचवले. अँडरसनने इशांत शर्माला शून्यावर बाद करून भारतचा डाव अवघ्या ३५ षटकात १०७ धावांवर गुंडाळला याचबरोबर त्याने भारताची पाचवी शिकार केली. 

इंग्लिश गोलंदाजांनी पावसामुळे ओलसर झालेल्या खेळपट्टीचा चांगलाच फायदा उचलाला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने २० धावात ५ तर वोक्सने १९ धावात २ बळी घेतले. त्यांना ब्रॉड आणि कुरेन यांनी १ बळी घेत साथ दिली.