IPL मध्ये महिला क्रिकेटचा ट्रेलर, वानखेडेवर भिडणार हे दोन संघ | पुढारी 
Wed, Aug 22, 2018 08:11होमपेज › Sports › IPL मध्ये महिला क्रिकेटचा ट्रेलर, वानखेडेवर भिडणार हे दोन संघ

IPL मध्ये महिला क्रिकेटचा ट्रेलर, वानखेडेवर भिडणार हे दोन संघ 

Published On: May 17 2018 4:20PM | Last Updated: May 17 2018 4:07PMमुंबई : पुढारी ऑनलाई न

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत 22 मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्लेऑफच्या पहिल्या क्‍वॉलिफायर सामन्यापूर्वी महिलांचा प्रदर्शनीय सामना खेळवण्यात येणार आहे. यासाठीच्या दोन संघाची बीसीसीआयने गुरुवारी घोषणा केली. यात प्रत्येक संघात १३ अशा एकूण २६ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक संघात ५ परदेशी महिला क्रिकेटर्संचा समावेश करण्यात आला आहे. यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघातील महिला क्रिकेटर्सचा समावेश आहे.  

स्मृतीची मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोन भारतीय महिला क्रिकेटर्स आपीएलच्या ऐतिहासिक सामन्यात नेतृत्व करताना दिसणार आहेत. भारतीय संघाची सलामीची फलंदाज स्मृतीकडे ट्रेलब्लेझर्सचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर हरमनप्रीत कौर सुपर नोवाज संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.  

आयपीएलमध्ये निवडलेले महिलांचे दोन संघ पुढीलप्रमाणे :   

आयपीएल ट्रेलब्लेझर्स- अलायसा हेली (यष्टीरक्षक), स्मृती मानधना (कर्णधार), सुझी बेट्स, दिप्ती शर्मा, जेमीमी रोड्रीग्ज, बेथ मुनी, डॅनियल हेजल, शिखा पांडे,ली ताहूहु, झुलन गोस्वामी, एकता बिश्त, पुनम यादव, दयालन हेमलता 

आयपीएल सुपरनोवाज- डॅनियल वॅट, मिताली राज, मेग लेनिंज्स, हरमनप्रित कौर (कर्णधार), सोफी डेविन, एलिसा पेरी, वेदा कृष्णमुर्ती, मोना मेश्राम, पुजा वस्त्राकर, मेगन कट्स, राजेश्वरी गायकवाड, अनुजा पाटील, तानिया भाटिया (यष्टीरक्षक)