Fri, Mar 22, 2019 04:08
    ब्रेकिंग    होमपेज › Sports › विराट- धोनी नव्हे तर साक्षी अन् अनुष्काची चर्चा

विराट- धोनी नव्हे तर साक्षी अन् अनुष्काची चर्चा

Published On: Apr 17 2018 12:06PM | Last Updated: Apr 17 2018 12:06PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यातील नेतृत्व गुणाची तुलना ही आक्रमक आणि कुल अशी केली जाते. इंडियन प्रिमियर लीगच्या अकराव्या हंगामात एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. क्रिकेटच्या मैदानावर ज्या प्रमाणे मिसेस धोनी वर्सेस मिसेस कोहली यांच्या स्वभावाची तुलना होताना दिसते.

विराटला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर हजर असणारी अनुष्का शर्मा आक्रमक अंदाजात  विराट आणि संघाला प्रोत्साहन देताना दिसली होती. बंगळुरुमध्ये रंगलेल्या सामन्यात  रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयानंतर तिने चांगलाच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. तिच्या हटके अंदाजाची जोरदार चर्चाही रंगली.  त्यानंतर आता सोशल मीडियावर अनुष्काची आणि महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी यांच्या स्वभावाची चर्चा होऊ लागली आहे. 

आयपीएलच्या हंगामात चेन्नईच्या सामन्यात साक्षी चिमुकल्या झिवासोबत आवर्जून उपस्थित असते. पण, सामन्यादरम्यान परिस्थिती कितीही रोमहर्षक असली तरी ती शांतपणे सामन्याचा आनंद घेते. त्यामुळे साक्षी आपल्या कुल कर्णधारासारखी कुल आणि अनुष्का ही विराटसारखीच आक्रमक असल्याचे प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटत आहे.  

मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील अनुष्का शर्माचा आक्रमक अंदाज पाहायला मिळू शकतो. याशिवाय मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी ह्रतिकाने या सामन्याला येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात मैदानातील रंगतदार लढतीशिवाय स्टेडियममधील अंदाजात एक वेगळा माहोल दिसल्यास नवल वाटणार नाही.       

Tags : Anushka Sharma, Anushka Sharma Aggressive, Celebration, Virat Kohli, IPL,Funny Memes