होमपेज › Sports › पहिल्या दिवशी उपहारापूर्वीच शतक ठोकणारा धवन पहिला भारतीय!

पहिल्या दिवशी उपहारापूर्वीच शतक ठोकणारा धवन पहिला भारतीय!

Published On: Jun 14 2018 1:32PM | Last Updated: Jun 14 2018 1:32PMबंगळुरू : पुढारी ऑनलाईन

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारताचा सलामीवीर शिखर धवनने खणखणीत शतक झळकाले. शिखरने उपहारापूर्वी शतक ठोकून जगातील सहावा आणि भारतातील पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. शिखरने ८७ चेंडूत १०४ धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला. 

धवनने आधी ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्‍यानंतर त्याने धावगती वाढवत अवघ्या ८७ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाला १८ चौकार आणि ३ षटकाचा समावेश आहे. 

कर्णधार अजिंक्य राहणेने नाणेफेक जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय शिखर धवन आणि मुरली विजय यांनी सार्थ ठरवला आहे. उपहारापूर्वी भारताने २७ षटकात १५८ धावा केल्या होत्या.  मुरली विजय ७२ चेंडूत नाबाद ४१ तर शिखर धवन ९१ चेंडूत १०४  धावांवर खेळत होता. उपरानंतर धवन १०७ धावांवर बाद झाला. यमीन अहमदझाईने मोहम्मद नबीकडे झेल देवून अफगाणिस्‍तानला धवनच्या रूपाने पहिला बळी मिळवून दिला.