Wed, Jul 24, 2019 14:26होमपेज › Soneri › विराट कोहलीवर भडकला 'हा' अभिनेता

विराट कोहलीवर भडकला 'हा' अभिनेता

Published On: Jul 12 2019 12:57PM | Last Updated: Jul 12 2019 12:57PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने भारताला तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळवत फक्त १८ धावांनी पराभूत केले. यावर सर्वच क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर सध्या यावर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान (केआरके) याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामध्ये त्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला ‘कर्णधारपद सोडून दे’ असे म्हटले आहे.  

कमाल आर खान याने विराटवर राग व्यक्त करत म्हटले आहे की, विराट तू आधी आम्हाला हे सांग की आपण जिंकलो तरी कधी? तुला तर आयपीएलमध्येही विजयी होता आलेले नाही. तुझ्या पराभवानंतरही लोकांनी तुला सर्वोत्तम खेळाडू म्हटले आहे,’ तर टिम इंडियाची सर्वात मोठी चूक ही होती की, त्यांनी न्यूझीलंडला कमी लेखले. 

भारतीय संघावर एकीकडून टिका होते तर दुसरीकडे त्यांच्या कामगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये अभिनेता आमिर खानने भारतीय संघाच्या पराभवानंतर संघाला धीर दिला आहे. यामध्ये बोमन इराणी, आयुष्मान खुराना, सुनिल शेट्टी, वरूण धवन, अनुपम खेर या अभिनेत्यांचाही समावेश आहे.  

(photo : KRK twitter वरून साभार)