Mon, Dec 10, 2018 03:06होमपेज › Soneri › विराट-अनुष्‍काचा क्‍लोज डान्‍स व्‍हायरल (Video)

विराट-अनुष्‍काचा क्‍लोज डान्‍स व्‍हायरल (Video)

Published On: Feb 13 2018 4:22PM | Last Updated: Feb 13 2018 4:25PMनवी दिल्‍ली : वृत्तसंस्‍था 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांचा पार्टी डान्‍सच आतापर्यंत तुम्‍ही पाहिला असेल. पण, विरूष्‍काचा क्‍लोज डान्‍स तुम्‍ही कधीही पाहिला नसणार, हे नक्‍की! विरूष्‍काचा क्‍लोज डान्‍स सध्‍या सोशल मीडियावर व्‍हायरल होत असून विराटचे चाहते असलेल्‍या एका ग्रुपने त्‍यांच्‍या इन्‍स्‍टाग्राम अकाऊंटवर या डान्‍सचा व्‍हिडिओ पोस्‍ट केला आहे. 

Related image

डिसेंबर २०१७ मध्‍ये इटलीमध्‍ये विरूष्‍का विवाह बंधनात अडकले. तर दिल्‍ली आणि मुंबईत त्‍यांनी मॅरेज रिसेप्‍शन पार्टी ठेवली होती. या पार्टीत विरूष्‍काने जबरदस्‍त डान्‍स केला होता. या डान्‍सचा व्‍हिडिओदेखील त्‍यांनी शेअर केला होता. नंतर दोघे हनीमूनसाठी टूरला गेले. याची माहिती आपल्‍या चाहत्‍यांना त्‍यांनी सुट्‍टी एन्‍जॉय करतानाचे फोटो शेअर करून दिली होती.

Related image

तसं पाहिलं तर विरूष्‍का नेहमीच आपले काही फोटोज, चित्रपटाची माहिती, व्‍हिडिओज आणि फॅमिली इवेंट्‍सचे फोटोजही आपल्‍या चाहत्‍यांसाठी सोशल मीडियावरून शेअर करत असतात. आता त्‍यांच्‍याच चाहत्‍यांनीच मुंबई येथील विरूष्‍काच्‍या मॅरेज रिसेप्‍शनमधील त्‍यांचा एक क्‍लोज डान्‍स व्‍हिडिओ शेअर केला आहे. या व्‍हिडिओत विरूष्‍का क्‍लोज डान्‍स करताना दिसत आहेत. सध्‍या हा व्‍हिडिओ सोशल साईटवर व्‍हायरल होत आहे.