Fri, Jul 19, 2019 15:27होमपेज › Soneri › 'सुई धागा'च्या नव्या पोस्टरमध्ये ग्रामीण अंदाजात दिसले वरुण-अनुष्का !

'सुई धागा'च्या नव्या पोस्टरमध्ये ग्रामीण अंदाजात दिसले वरुण-अनुष्का !

Published On: Aug 10 2018 2:06PM | Last Updated: Aug 10 2018 2:01PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवुड अभिनेत्री अनुष्‍का शर्माच्‍या चाहत्‍यांसाठी खूशखबर आहे. कारण परी हा चित्रपट रिलीज होउन पाच महिने झाले आहेत. तब्‍बल पाच महिन्‍यानंतर अनुष्‍क शर्माला 'सुई धागा' या चित्रपटात दिसणार आहे. 

Image result for anushka sharma and varun dhawan

या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत अभिनेता वरुण धवन  प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच  'सुई धागा' या चित्रपटाचे  नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यासोबतच चित्रपटाचा ट्रेलर १३ ऑगस्टला रिलीज करण्यात येणार असल्याची ही माहिती देण्यात आली आहे.

Image result for anushka sharma and varun dhawan

या चित्रपटाचे पोस्टर हिंदी चित्रपट समीक्षक  तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अनुष्‍का आणि वरुण धवनचा  ग्रामीण अंदाज पाहायला मिळत आहे. हा चित्रपट  ‘मेक इन इंडिया’ यावर आधारित आहे. 

‘सुई धागा’मध्ये अनुष्का विणकाम करणारी तर वरुण शिंप्याची (टेलर) भूमिका साकारत आहे. अनुष्‍का यामध्‍ये वरुण धवनच्‍या पत्‍नीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शरत कटारिया करत असून 'यश राज फिल्म्स' बॅनरअंतर्गत हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.