Sun, Feb 24, 2019 02:59होमपेज › Soneri › Valentine special : 'या' प्रेमाला तोड नाही

Valentine special : 'या' प्रेमाला तोड नाही

Published On: Feb 14 2018 12:06PM | Last Updated: Feb 14 2018 12:06PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

सगळीकडे व्‍हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन होत आहे. १४ फेब्रुवारीला फ्रेंड्‍स आपल्‍या भावना, प्रेम आज व्‍यक्‍त करतात. तुम्‍हाला माहित आहे का बॉक्‍स ऑफिसवरही 'प्रेम' या थीमवर अनेक चित्रपट आले आणि गाजलेदेखील. यात 'एक दुजे के लिए,' 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटांपासून 'तेरे नाम'पर्यंत यासारख्‍या चित्रपटांनी खरं प्रेम काय असतं हे शिकवलं. पाहुयात हे चित्रपट कोणते आहेत ते? 

Related image

'एक दुजे के लिए' 

१९८१ मध्‍ये आलेला एक दुजे के लिए या चित्रपटाने अक्षरश: वेड लावलं होतं. चित्रपटात वासू म्‍हणजेच कमल हसन आणि सपना म्‍हणजेच रति अग्‍निहोत्री यांच्‍यामधील प्रेम हे जग विसरायला लावणार होतं. दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं. आणि घरच्‍यांकडून विरोध झाल्‍यानंतर दोघेही आत्‍महत्‍या करतात. प्रेम काय असतं, हे या चित्रपटानं दाखवून दिलं होतं.

Image result for lmhe

 'लम्हे' 
'लम्हे' हा चित्रपट १९९१ मध्‍ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची एक वेगळीच परिभाषा आहे. यातील कथा गुंतागुंतीची असली तरी शेवटी प्रेमाची परिभाषा वेगळीच असते, चित्रपटात दाखवण्‍यात आलं. यात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची  मुख्‍य भूमिका होती.  

Image result for 'प्‍यार किया तो डरना क्‍या'

'प्‍यार किया तो डरना क्‍या'
सन १९९८ मध्‍ये आलेला चित्रपट 'प्यार किया तो डरना क्या' यात सूरज आणि मुस्कानची कहाणी आहे. सूरज म्‍हणजेच सलमान खान आणि मुस्‍कान म्‍हणजेच काजोल या दोघांच प्रेम असतं. या दोघांच्‍या प्रेमाला मुस्‍कानचा भाऊ म्‍हणजेच अरबाज खानचा विरोध असतो. पण, सूरजला मुस्‍कानचं प्रेम मिळवण्‍यासाठी बरीच मेहनत घ्‍यावी लागते. मुस्‍कानच्‍या भावाला आपण मुस्‍कानवर खरं प्रेम करतो, हे दाखवण्‍यासाठी स्‍वत:ला सिध्‍द करावं लागतं. 

Image result for 'दिलवाले दुल्‍हनिया ले जाएंगे'

'दिलवाले दुल्‍हनिया ले जाएंगे'
'जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी' हा डायलॉग आठवतो का? हा डायलॉग आहे, १९९५ मध्‍ये आलेला शाहरूख खान आणि काजोल स्‍टारर 'दिलवाले दुल्‍हनिया ले जाएंगे' या सिनेमातला. यात काजोलने सिमरनची आणि शाहरूखने राजची भूमिका केली होती. दोघांमधील मैत्रीच रूपांतर प्रेमात कधी होतं, हे त्‍यांना कळतचं नाही. दोघांनाही एकमेकांबद्‍लचं प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी संधीही मिळत नाही. पण, शेवटी जिंकते ते प्रेम. यातील काजोल-शाहरूखचं निस्‍वार्थी प्रेम हे प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलं. शाहरूख आणि काजोलच्‍या मस्‍त केमिस्‍ट्रीमुळे हा सिनेमा मोठ्‍या पडद्‍यावर हिट ठरला. यात अमरिश पुरी यांची भूमिका लक्षात राहण्‍यासारखी होती. 

Image result for 'हम दिल दे चुके सनम'

'हम दिल दे चुके सनम' 
१९९९ मध्‍ये हम दिल दे चुके सनम या चित्रपटाने एक वेगळी उंची गाठली. प्रेमाला सीमा नसते, हे या चित्रपटाने दाखवून दिलं. सलमान खान (समीर) ऐश्‍वर्या (नंदिनी) यांच्‍या क्‍यूट जोडीने प्रेक्षकांना मोहिनी घातली. ही मोहिनी होती प्रेमाची. पण, पण नंदिनीच्‍या आयुष्‍यात आलेला अजय देवगन (वनराज) यामुळं समीर आणि नंदिनी एकमेकांपासून दूर होतात. पण, शेवटी नंदिनीचं प्रेम समीरलाच मिळतं. हे शक्‍य होतं केवळ वनराजमुळे. वनराज आपली पत्‍नी नंदिनीला स्‍वत: तिचा प्रियकर समीरशी भेटवतो. हा लव ट्रँगल वेगळा असला तरी दर्शकांना हा चित्रपट आवडला होता.    

Related image

'मोहब्‍बते'
'मोहब्‍बते' चित्रपट आठवतोय का? हा २००० मध्‍ये आलेल्‍या या चित्रपटाने प्रेमाची परिभाषा शिकवली. प्रेमाला कोणीही हरवू शकत नाही, हे या चित्रपटाने दाखवून दिलं. ही कथा राज या तरूणाची होती. तिची प्रेयसी मेघाच्‍या मृत्‍यूनंतरही राज आपलं प्रेम विसरत नाही. विरोध असतानाही राज गुरूकुलमध्‍ये शिकणार्‍या स्‍टुडंट्‍स ना प्रेम करणं शिकवतो. यात शाहरुख खान, ऐश्वर्या राय, उदय चोप्रा, जुगल हंसराज, जिमी शेरगिल, शमिता शेट्टी, किम शर्मा आणि प्रीति झंगियानी यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. 

Related image

'तेरे नाम' 
तेरे नाम चित्रपट म्‍हटला की, यातील सलमान खानची हेअरस्‍टाईल आठवली ना! हा चित्रपट २००३ मध्‍ये आला होता. यात राधे म्‍हणजेच सलमान खान आणि निर्जला म्‍हणजेच भूमिका चावला यांची लव स्‍टोरी दाखवण्‍यात आली आहे. चित्रपटात फॅमिली कंटेन्‍ट असला तरी लव अँगल प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरला. राधे आणि निर्जला एकमेकांवर प्रेम करत असताना निर्जलावर दुसर्‍या व्‍यक्‍तीसोबत लग्‍न लाऊन देण्‍यासाठी घरच्‍यांकडून दबाव आणला जातो. निर्जलाला आपलं प्रेम मिळत नाही. अखेर ती आपलं जीवन संपवते.