Sat, Aug 24, 2019 10:45होमपेज › Soneri › 'उरी' ने तोडले 'बाहुबली२' चे रेकॉर्ड

'उरी' ने तोडले 'बाहुबली२' चे रेकॉर्ड

Published On: Feb 11 2019 2:03PM | Last Updated: Feb 11 2019 2:03PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

२०१९ च्या सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत 'उरी' या चित्रपटाने नवीन रेकॉर्ड बनवले आहे. २०१६ मधील 'सर्जिकल स्‍ट्राइक' या कथेवर आधारित या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. 'उरी' या चित्रपटाने पाचव्या आठवडयात (शनिवारी) ४ कोटींहून अधिक कमाई केली आहे. या घसघशीत कमाईने 'उरी'ने 'बाहुबली २' ला मागे टाकले आहे. 'बाहुबली २' ने पाचव्या आठवडयात २ कोटीची कमाई केली होती. शनिवारी 'उरी' या चित्रपटाने बाहुबली 2' चे रेकॉर्ड तोडून दुप्पट कमाई केली आहे.    

ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर करत त्यांनी सांगितले की, या चित्रपटाच्या कमाईने एक नवीन इतिहास बनला आहे.

पहिल्या आठवडयात ७१.२६ कोटी, दुसऱ्या आठवडयात ६२.७७ कोटी, तिसऱ्या आठवडयात ३७.०६ कोटी, चौथ्या आठवडयात २९.०७ कोटी आणि पाचव्या आठवडयात (शनिवारी) ४.६० कोटीची कमाई केली आहे. एकूणच या चित्रपटाने २०७. १३ कोटीची घसघशीत कमाई केली आहे. 

 देशभक्तीवर आधारित 'उरी' चित्रपट 

१८ सप्टेंबर २०१६ रोजी दहशतवाद्यांनी काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर हल्ला केला होता. यात १९ सैनिक शहीद झाले होते. याचा बदला सर्जिकल स्‍ट्राइक करून घेतला.  या घटनेवर आधारीत 'उरी' चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. 

या चित्रपटात विकी कौशलसोबत परेश रावल, यामी गौतम आणि टीव्ही अभिनेता मोहित रैना यांच्या भूमिका आहेत.. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले. 
 

(twitt : @taran_adarsh वरून साभार)