Wed, Jan 16, 2019 21:23



होमपेज › Soneri › 'सावट'चे रहस्य २२ मार्चला उलगडणार

'सावट'चे रहस्य २२ मार्चला उलगडणार

Published On: Jan 11 2019 5:00PM | Last Updated: Jan 11 2019 5:00PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बर्‍याचदा चित्रपटाचे कथानक म्हटले की, काही चांगल्या प्रवृत्ती विरूध्द काही वाईट प्रवृत्तींचा लढा असतो. पण काही कथा सत्य-असत्य, पाप-पुण्याच्या पलिकडच्या असतात. हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटही योग्य-अयोग्याच्या पल्याडच्या गुढ, रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या अनाउन्समेन्ट पोस्टरवर दिसणार्‍या काळ्या-पांढर्‍या रंगांना असलेली रक्ताची किनार हिच गोष्ट अधोरेखीत करत आहे. 

याविषयी 'सावट'ची निर्माती हितेशा देशपांडे म्हणते, ''आपला देश सध्या इंडिया आणि भारत अशा दोन भागात दुभंगला आहे. एकीकडे आपल्या देशातल्या महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावताना आपण पाहतो, तर दुसरीकडे सोवळ-ओवळ्याला ही आपण खूप जास्त महत्त्‍व देतो. मोबाईल आज गावागावात पोहोचला. पण, भूत-प्रेत, जादूटोणा, चेटूक यामुळे आजही आपण अंधश्रध्देच्या कचाट्यातून बाहेर पडलेलो नाही आहोत. यावरच सिनेमामधून भाष्य केले आहे. पण हे करताना कुठेही उपदेशाचा डोस न पाजता दिग्दर्शक तुम्हांला सलग दोन तास खुर्चीला खिळवून ठेवतो.”
चित्रपटात असणाऱ्या गूढ,थरारक कथेचा आणि दृशांचा एकंदरीत गडद अंदाज पोस्टरवरून बांधता येत आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ सिन्हा म्हणाले, “सावटचे कथानक हे आपल्या सर्वांमधल्या नकारात्मकतेचे प्रतीक आहे. आपला समाज आपल्याला बर्‍याचदा रूढींची पडताळणी न करता त्या पाळायला भाग पाळतो. सावटची कथा श्रध्दा आणि अंधश्रध्देच्या किनार्‍यावर असलेल्या या समजूतींवर भाष्य करते. या गुढकथेमधली पात्र तुम्हाला या चित्तथरारक प्रवासात खिळवून ठेवतात.”

सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटात स्मिता तांबे , मिलिंद शिरोळे, श्वेतांबरी घुटे आणि संजीवनी जाधव मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला रिलीज होणार आहे.