Mon, Jun 17, 2019 11:17होमपेज › Soneri › सचिन खेडेकरांचा आवाज ‘रेडीमिक्स’ टीझरला!

सचिन खेडेकरांचा आवाज ‘रेडीमिक्स’ टीझरला!

Published On: Jan 12 2019 3:46PM | Last Updated: Jan 12 2019 3:46PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अमेय विनोद खोपकरचा 'रेडीमिक्स' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'रेडीमिक्स'ची पहिली झलकही पाहायला मिळते. आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या मुख्‍य भूमिका या चित्रपटात आहेत. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातील मोजक्या शब्दातील खुमासदार वर्णन यामुळे ही पहिली झलक रसिकांवर मोहिनी घालत आहे. कलाकारांच्या व्यक्तिरेखा नेमक्या कशा आहेत? आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे? हे लक्षवेधी दृकश्राव्य ट्रेलरमध्‍ये दाखवण्‍यात आले आहे. 

निर्माते प्रशांत घैसास, सुनील वसंत भोसले निर्मित ‘रेडीमिक्स’मध्ये समीर चिटणीस या उमद्या तरुणाची कथा आहे. हा तरुण इंटिरियर डेकोरेटर असतो. त्याच्या आयुष्यात नुपूर ही सुंदर तरुणी येते आणि त्यानंतर त्याचे आयुष्य रोमँटिक वळण घेते. आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे आणि हरहुन्नरी अभिनेत्री नेहा जोशी यांच्या अफलातून अभिनयाचे रसायन नक्कीच प्रफुल्लीत करणारे आहे. जोडीला अभिनेते सुनील तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे, गिरीश परदेसी, आशा पाटील, रमा नाडगौडा, अश्विनी कुलकर्णी, उदय नेने, राजू बावडेकर, आशिष गोखले इत्यादी कलाकारांची अफलातून साथ आहे.

गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, अभय इनामदार यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांना अविनाश–विश्वजित यांनी संगीतसाज चढवला आहे. गायिका आर्या आंबेकर, मुग्धा कऱ्हाडे, शिखा जैन, गायक आशिष शर्मा, फराद भिवंडीवाला, विश्वजित जोशी यांनी त्यावर स्वरसाज चढविला आहे. कोरिओग्राफर दिपाली विचारे यांनी नृत्यरचना केली आहे. 

************************************************************************