Wed, Jun 19, 2019 08:10होमपेज › Soneri › या मराठी चित्रपटात दिसणार क्लोथलेस हिरो (Video)

मराठी चित्रपटात दिसणार क्लोथलेस हिरो (Video)

Published On: Jan 11 2019 4:06PM | Last Updated: Feb 05 2019 5:50PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटाचा पहिला लूक रिलीज करण्‍यात आला. पोस्टरमध्ये चित्रपटातील मुख्‍य अभिनेता अभय महाजन निव्रस्त्रपणे कमरेला ट्यूब टायर लावून रस्त्यावरून धावताना दिसतोय. मराठी चित्रपटातील इतिहासात हिरोचा असा पहिल्यांदाच परिचय होताना दिसत आहे.

एम. एस. धोनी आणि फ्लाईंग जट यासासारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे सुरज सिंग 'लकी' चित्रपटातून  मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. या पोस्टरबद्दल लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग म्हणाले, “मराठी तरूण आणि मराठी सिनेमा कात टाकतोय. आजच्या तरूणांवरचा सिनेमा असल्याने तुम्हाला असे अनेक सुखद आश्चर्याचे धक्के मिळणार आहेत. संजयदादा निखळ मनोरंजनासाठी लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या धाटणीची मनोरंजक फिल्म आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय.”

संजय जाधव म्हणाले, “लकी ही आजच्या तरूणाईची कथा आहे. आजचे तरूण बिनधास्त आणि स्वच्छंद आहेत. त्यांची एकमेकांशी बोलण्याची भाषा खूप मोकळी-ढाकळी आहे. ते परंपरांगत काहीच करत नाहीत. त्यामुळे लकीमध्येही तुम्हाला अशी अपारंपरिक सरप्राइजेस मिळतील.”

अभिनेता अभय महाजन म्हणाला, “लकी या तरूणाची ही एक मजेशीर कथा आहे आणि या सिनेमात मी अशा अनेक अनकन्वेशनल गोष्टी पहिल्यांदाच केल्या आहेत. दादांच्या सिनेमाचा हिरो असणे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याहून भारी गोष्ट असते, ती म्हणजे त्या हिरोची ‘लक्षवेधी’ एन्ट्री. “

संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दीपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन यांच्‍या मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी, २०१९ मध्‍ये रिलीज होणार आहे.