Tue, Jan 22, 2019 07:26होमपेज › Soneri › कर्नाटकच्‍या राज्‍यपालांवर ट्‍विट, उदय चोप्रा ट्रोल 

कर्नाटकच्‍या राज्‍यपालांवर ट्‍विट, उदय चोप्रा ट्रोल 

Published On: May 17 2018 4:23PM | Last Updated: May 17 2018 4:23PMउदय चोप्राने कर्नाटक निवडणुकीवर घेतली फिरकी 

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन  

कर्नाटक निवडणुकीच्‍या निकालानंतर नाट्‍यमय घडामोडी घडल्‍या. भाजपला बहुमत सिध्‍द करण्‍यासाठी आता १५ दिवसांचा वेळ मागितला आहे. परंतु, अजुनही सस्‍पेन्‍स बाकी आहे की कोणाचं सरकार येणार? यावर चित्रपट धूम फेम अभिनेता उदय चोप्राने फिरकी घेत सोशल मीडियावर एक ट्‍विट केलं आहे. या ट्‍विटनंतर सोशल मीडियावर युजर्सकडून उदय चोप्रा ट्रोल होत आहे. 

उदय चोप्राने लिहिलयं की, 'मी आताच google वर कर्नाटकाच्‍या गव्‍हर्नरबद्‍दल सर्च केलं. हे  यह भाजप आणि आरएसएसशी जोडलेले आहेत. मला वाटते की, आमल्‍या सर्वांना माहिती आहे की, काय होणार आहे?' इतकेच नाही तर उदयने ट्‍विटरवर कर्नाटकच्‍या गव्‍हर्नरची विकीपीडिया लिंकदेखील शेअर केली आहे. 

खरंतरं, उदय चोप्राचा इशारा कर्नाटकचे राज्‍यपाल वजुभाई वाला काय निर्णय घेणार आहेत? याकडे होता. यानंतर मात्र, उदयला युजर्सनी ट्रोल करण्‍यास सुरूवात केली.