Wed, Jun 19, 2019 08:09होमपेज › Soneri › लग्‍नानंतर अनुष्कासह 'या' स्‍टार्सची पहिली दिवाळी (Pics)

लग्‍नानंतर अनुष्कासह 'या' स्‍टार्सची पहिली दिवाळी (Pics)

Published On: Nov 09 2018 3:30PM | Last Updated: Nov 09 2018 3:30PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची लग्‍नानंतरची दिवाळी खास ठरली. अनुष्‍का-विराटने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही दिवाळी खास पध्‍दतीने साजरी केली आणि दिवाळीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. या कपलने शेअर केलेल्‍या फोटोत त्‍याचे घर सजवलेले दिसत आहे. त्‍या घरात विराट-अनुष्‍का उभारलेले दिसत आहेत. 

विराटने फोटोकॅप्‍शन लिहिलयं की- 'आमच्‍या परिवाराकडून सर्वांना दिवाळीच्‍या हार्दिक शुभेच्‍छा...! सर्वांना शांती, आनंद आणि चांगलं आरोग्‍य मिळो. सर्वांवर ईश्‍वराचा आशीर्वाद राहो.' 

दिवाळीच्‍या औचित्‍याने विराट इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्‍ये हँडसम दिसत आहे. साडीमध्‍ये अनुष्का खूपच सुंदर दिसत आहे. 

'या' कलाकारांनी अशा दिल्‍या दिवाळीच्‍या शुभेच्‍छा 

दिवाळीचा सण संपूर्ण देशात साजरा होत आहे. बॉलिवूडमध्‍ये दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. सोनम कपूर, नेहा धूपिया आणि अंगद बेदी यासारख्‍या सेलिब्रिटींची लग्‍नानंतरची पहिली दिवाळी आहे. तर दीपिका पादुकोण-रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा-निक जोनस दिवाळीनंतर लग्‍न करणार आहेत. त्‍याचबरोबर कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील दिवाळीनंतर त्‍याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ सोबत विवाह बंधनात अडकणार आहेत.

दीपिका-रणवीर १४ आणि १५ नोव्‍हेंबरला तर कपिल शर्मा-गिन्‍नी १२ डिसेंबरला विवाह बंधनात अडकणार आहेत. तर प्रियांका चोप्रा लग्‍नाआधी बॅचलर पार्टी एन्जॉय करत आहेत. 

करण जोहर, नेहा धुपियासह अन्‍य कलाकारांनी दिवाळीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.