Wed, Feb 26, 2020 18:52होमपेज › Soneri › बॉक्स ऑफिस : 'तान्हाजी'ची २०० कोटींकडे वाटचाल 

'तान्हाजी'ची २०० कोटींकडे वाटचाल 

Last Updated: Jan 24 2020 4:38PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

तान्हाजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अजय देवगनचा हा १०० वा चित्रपट आहे. हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होण्यास सज्ज झाला आहे. अजय देवगन, काजोल, सैफ अली खान स्टारर 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'ने दोन आठवड्यात १९७. ४५ कोटींची कमाई केली होती. 

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने दुसर्‍या आठवड्यात ७७ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. लवकरच हा चित्रपट २०० कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी वर्तवला आहे.