Sat, Jul 04, 2020 12:16होमपेज › Soneri › घराचं वीज बिल पाहून तापसी संतापली 

घराचं वीज बिल पाहून तापसी संतापली 

Last Updated: Jun 29 2020 11:00AM

तापसी पन्नूनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह राहते. देशात घडणाऱ्या घडामोडींवरदेखील ती आपले स्पष्ट मत मांडते. परंतु, अभिनेत्री तापसी पन्नू आता चिंतेत आहे आणि आपली चिंता तिने सोशल मीडियावर मांडली आहे. आपल्या घराचे वीज बिल पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला. या गोष्टीची माहिती तापसी पन्नूने आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे. 

तापसीच्या घराचे एका महिन्याचे बिल ३६ हजार रुपये आले आहे. देशात मागील ३ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत तापसी पन्नू आपले बिल पाहून चिंतेत आहे. कारण तिने आपल्या घरात कोणतेही नवे उपकरण, मशीन अथवा इलेक्ट्रिकल वस्तू खरेदी केलेली नाही किंवा अधिक वीज वापरलेली नाही.

तापसी पन्नूने ट्विट करत लिहिलं आहे, 'लॉकडाऊनचे ३ महिने आणि मला आश्चर्य वाटत आहे की, मी मागील महिने माझ्या घरी कुठल्याही नव्या उपकरणांचा उपयोग केलेला नाही आणि नवी कोणतीही वस्तू खरेदी केलेली नाही. परंतु, वीजेचे वाढीव बिल मात्र आले आहे...' 

अभिनेत्री तापसी पन्नूने आणखी एक ट्विट केलं आहे, यामध्ये तिने लिहिले आहे, "आणि हे तिच्या अपार्टमेंटचे बिल आहे, जिथे कोणीही राहत नाही. आणि आठवड्यात केवळ एकदाच साफसफाई करण्यासाठी जातो."

तापसी पन्नूने म्हणाली, "मला आता चिंता होत आहे की, कोणीतरी अपार्टमेंटचा उपयोग करत आहे..." तापसी पन्नूचे हे ट्विट व्हायरल होत आहे आणि लोकांनी यावर प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे.