Fri, Jun 05, 2020 21:07होमपेज › Soneri › स्‍वरा, निवडणुकीत मिळालेले पैसे उडवतेस काय? युजर्स बरळले

स्‍वरा, निवडणुकीत मिळालेले पैसे उडवतेस काय? युजर्स बरळले

Published On: Jun 12 2019 4:34PM | Last Updated: Jun 12 2019 4:34PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

लोकसभा निवडणुकीमध्‍ये कन्‍हैया कुमारसहित आपच्‍या उमेदवारांचा प्रचार करणारी अभिनेत्री स्‍वरा भास्‍करला सोशल मीडियावरून ट्रोल केले जात आहे. अभिनेत्री स्‍वरा भास्‍कर सध्‍या सेंट पीटर्सबर्गमध्‍ये टाईम स्‍पेंड करत आहे. तिने येथील काही फोटो आपल्‍या ट्विटरवर पोस्‍ट केले आहेत. हे फोटो पाहिल्‍यानतर ट्रोलर्स भडकले आहेत. ट्रोलर्सनी स्‍वराच्‍या लुकवर कॉमेंट केली आहे. तर काही युजर्सनी स्‍वरावर लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्‍यावरून निशाणा साधला आहे.   

अंकिता जैन नावाच्‍या युजरने स्‍वरा भास्‍करच्‍या पोझवर निशाणा साधत म्‍हटले आहे, मान, वाकडी कशी झाली आहे. तर सारिका सिंहने स्‍वराला भटकती आत्‍मा म्‍हटले आहे. इतकेच नाही तर आणखी एका युजरने म्‍हटले आहे, निवडणुकीत मिळालेले पैसे उडवणारी एक सन्‍मानित फ्लॉप कलाकार भारतीय नारी. अनेक जणांनी स्‍वरासाठी  अपशब्‍ददेखील म्‍हटले आहेत. 

हे स्‍वरासोबत पहिल्‍यांदा घडलेले नाही. याआधीही स्‍वरा भास्‍कर अनेकवेळा ट्रोल झाली आहे. अनेकवेळा तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तरही दिले आहेत. 

स्वरा भास्कर एक चांगली अभिनेत्री आहे. परंतु, ती आपल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे नेहमी चर्चेत राहते. तिने अनेकदा वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले आहेत. स्वरा भास्करने 'वीरे दी वेडिंग'मध्‍ये काम केले होते. यातील तिच्‍या भूमिकेची जोरदार चर्चा झाली होती. चित्रपट २०१८ ला रिलीज झाला होता. वीरे दी वेडिंगमध्‍ये स्वराने मास्टरबेशन सीन दिला होता. या सीनमुळे स्‍वरा खूप ट्रोल झाली होती. 

स्वरा भास्करचा जन्म ९ एप्रिल, १९८८ ला दिल्लीमध्‍ये झाला होता. तिचे वडील भारतीय नेवीमध्‍ये अधिकारी होते. तिची आई जवाहर लाल नेहरू युनिव्‍हर्सिटीमध्‍ये सिनेमा स्टडीजची प्रोफेसर आहे. स्वरा चित्रपटांमध्‍ये सपोर्टिंग ॲक्ट्रेस म्‍हणून काम करत होती. तिने तनु वेड्स मनु, रांझणा, सबकी बजेगी बँड, मछली जल की राणी है, प्रेम रतन धन पायो, गुजारिश आणि वीरे दी वेडिंग यासारख्‍या चित्रपटांमध्‍ये काम केले आहे.