Sat, Jul 04, 2020 10:13होमपेज › Soneri › सुशांतने आत्महत्येचा दोनवेळा केला प्रयत्न?

सुशांतने आत्महत्येचा दोनवेळा केला प्रयत्न?

Last Updated: Jun 27 2020 4:08PM

 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे इंडस्ट्रीतील काही दिग्गजांनी म्हटले आहे. तर काहींनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, असे म्हटले आहे. मुंबईतील बांद्रा येथील फ्लॅटमध्ये सुशांतने गळफास घेतला होता. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतने गळफास घेण्यासाठी हिरवा कुर्ता वापरला होता. परंतु, त्याआधी सुशांतने आत्महत्या करण्यासाठी बाथ रोब बेल्ट वापरला होता. परंतु, तो बेल्ट तुटला होता. एका कुर्त्याने सुशांतचे वजन कसे काय पेलले, याचा तपास पोलिस करत आहेत. कुर्ता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. 

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना संशय आला जेव्हा रॉब बेल्टचे दोन तुकडे जमिनीवर पडले होते. सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी कुर्ता कापून खाली उतरवला होता. सूत्रांनुसार, कलिना फॉरेन्सिक लॅब (Kalina forensic lab) मध्ये कुर्ता पाठवण्यात आला आहे. एक कुर्ता सुशांतचे वजन पेलू शकतो का नाही, ही माहिती अहवालानंतर समोर येईल.