Sun, Mar 24, 2019 03:03होमपेज › Soneri › '...म्‍हणून मी कॅमेर्‍यासमोर बोल्‍ड सीन देते'

'...म्‍हणून मी कॅमेर्‍यासमोर बोल्‍ड सीन देते'

Published On: Apr 17 2018 12:14PM | Last Updated: Apr 17 2018 12:08PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

'हेट स्टोरी-२' फेम अभिनेत्री सुरवीन चावला तिच्‍या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. आताही तिने तिच्‍या मॅरेज लाईफवर शॉकिंग खुलासा केला आहे. एका मुलाखतीत विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर देताना सुरवीन मॅरेज लाईफवर उघडपणे बोलली.  

'लग्‍नानंतर काहीच बदललं नाही. उलट माझं आयुष्‍य आणखी चांगल झालं आहे. मी माझ्‍या को-स्‍टारला उघडपणे किस करू शकते, कॅमेर्‍यासमोर न्‍यूड सीन्‍स देऊ शकते, माझे पती काहीही म्‍हणणार नाहीत,' असं खूद्‍द सुरवीनने म्‍हटलं आहे. तिच्‍या या प्रतिक्रियानंतर कोणालाही पटणार नाही की,  लग्‍नानंतरही सुरवीनचा नवरा या गोष्‍टींना परवानगी देतो. 

dinsta

पण असो. दुसरं सांगायचं झालं सुरवीनने तिच्‍या बॉयफ्रेंडबद्‍दलही खुलासा केला आहे. २०१५ मध्‍ये इटलीत तिने तिच्‍या लॉन्‍गटाईम बॉयफ्रेंड अक्षय ठक्‍करसोबत लग्‍न केल्‍याची जोरदार चर्चा मध्‍यंतरी होती. परंतु, सुरवीनने जानेवारीमध्‍ये या वृत्ताचे खंडन केलं होतं. आता दिलेल्‍या मुलाखतीत सुरवीनने स्‍पष्‍टपणे आपली मते मांडली.

dinsta

ती म्‍हणाली, 'मला माहित नाही की, माझ्‍या लग्‍नाला घेऊन लोक इतके चिंतेत का आहेत? एकेकाळी अभिनेत्री आपलं प्रोफेशनल लाईफ पूर्ण झाल्‍यानंतर केवळ आपल्‍या मॅरेज लाईफवर लक्ष द्‍यायच्‍या. पण, आता तसं राहिलेलं नाही. जग बदललय. खूप सार्‍या अशा अभिनेत्री आहेत की, त्‍या लग्‍नानंतरदेखील आपलं करिअर घडवतात.'

dinsta