Mon, Jun 17, 2019 10:04होमपेज › Soneri › आधी चित्रपट पाहा, मगच निर्णय द्‍या : सुप्रीम कोर्टाचे ECला आदेश 

आधी चित्रपट पाहा, मगच निर्णय द्‍या : सुप्रीम कोर्टाचे ECला आदेश 

Published On: Apr 15 2019 4:18PM | Last Updated: Apr 15 2019 4:18PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

पीएम नरेंद्र मोदी बायोफिकवरील संकटाचे ढग हटायला तयार नाहीत. निवडणूक आयोगाने लोकसभा  निवडणुकीच्‍या काळात या बायोपिकवर बंदी घातल्‍यानंतर निर्मात्‍यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट पाहा, त्यानंतर निर्णय द्या, असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.

वाचा : 'पीएम मोदी बायोपिक'वर निवडणूक काळात बंदी 

चित्रपट निर्मात्‍यांनी निवडणूक आयोगाच्‍या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. निवडणूक आयोगाने चित्रपट न पाहताच बंदी घातली, असे म्‍हणणे निर्मात्यांनी याचिकेत मांडले होते. लोकसभा निवडणुकीच्‍या काळात आचारसंहितेचे उल्‍लंघन होऊ नये, म्‍हणून निवडणूक आयोगाने म्‍हटले होते. त्‍यामुळे पंतप्रधान मोदी यांच्‍या बायोपिकचे प्रदर्शन निवडणूक काळात रोखण्‍यात आले. 

वाचा : ३८ देशात रिलीज होणार 'पीएम मोदी' बायोपिक 

याआधी निवडणुकीच्या काळात पीएम मोदी बायोपिक आचारसंहितेचे उल्लंघन करते की नाही, याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असे सुप्रीम कोर्टाने म्‍हटले होते.निवडणूक आयोगाने पुढील निर्णय घ्यावा, असे सांगत कोर्टाने चित्रपटाच्या प्रदर्शनाची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपावली होती. 

वाचा : 'पीएम मोदी' बायोपिकचे प्रदर्शन रोखण्‍यास SCचा नकार

'पीएम मोदी' बायोपिक यादिवशी होणार रिलीज