Mon, Dec 10, 2018 02:43



होमपेज › Soneri › थलैवा रजनीकांतचा 'काला'तील स्‍टंट सीन लीक 

थलैवा रजनीकांतचा 'काला'तील स्‍टंट सीन लीक 

Published On: Feb 13 2018 5:42PM | Last Updated: Feb 13 2018 5:42PM



नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

थलैवा रजनीकांत यांचा काला हा चित्रपट सध्‍या चर्चेत आहे. त्‍याचं कारण असं की, या चित्रपटातील रजनीकांत यांचा एक स्‍टंट सीन सोशल साईटवर लीक झाला आहे. काला या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्‍यात आलीये. ही माहिती रजनीकांत यांचा जावई आणि ‘काला’चा निर्माता धनुष याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. यानंतर रजनीकांत यांच्‍या चाहत्‍यांना कालाची उत्‍सुकता लागून राहिली आहे. 

विशेष म्‍हणजे सोशल मीडियावर हा सीन लीक झाल्‍यानंतर कालाच्‍या चर्चेला उधाण आलं आहे. हा क्‍लायमॅक्‍स सीन असल्‍याचं सांगितलं जातयं. या व्‍हायरल व्‍हिडिओत रजनीकांत यांच्‍या आजूबाजूला आगीच्‍या ज्‍वाळा दिसत असून फायटींग करतानाचे हे दृश्‍य आहे. सीनमध्‍ये थलैवाची जबरदस्‍त ॲक्‍टिंग पाहायला मिळत आहे.