Sat, Aug 17, 2019 23:12



होमपेज › Soneri › ...म्हणून बोनींनीही ठरवलं होतं श्रीदेवींना चित्रपटात आणायचंच!

...म्हणून बोनींनीही ठरवलं होतं श्रीदेवींना चित्रपटात आणायचंच!

Published On: Aug 13 2019 4:04PM | Last Updated: Aug 13 2019 4:04PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री श्रीदेवी आज या जगात असत्या तर ५६ वर्षांच्या असत्या. श्रीदेवी यांचा १३ ऑगस्टला जन्मदिवस. श्रीदेवी आणि त्यांचे पती बोनी कपूर यांचे प्रेम सर्वश्रृत आहे. कुठलाही कार्यक्रम असो वा सोहळा बोनी कपूर यांनी आपल्यासोबत श्रीदेवी यांना कधी नेले नाही, असे झाले नाही. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्‍या लव्‍हस्‍टोरीला सुरूवात झाली ती एका चित्रपटाच्या निर्मितावेळी.  

आपण चित्रपट निर्माते बनावे, अशी बोनी यांची तीव्र इच्‍छा होती. बोनी यांनी काही बिग बजेट चित्रपट आणले. ते ब्लॉकबस्टरही झाले. झगमगत्‍या दुनियेत वावरताना  बोनी यांच्‍या आयुष्‍यात आली ती सुंदर तरुणी. जिचे नाव होते-श्रीदेवी. 
Image result for boney and sridevi

बोनी यांनी १९८० ते २०१२ या कालावधीत त्‍यांनी तब्‍बल ३२ चित्रपटांची निर्मिती केली. आपला धाकटा भाऊ अनिल कपूरला अभिनेता म्‍हणून त्‍यांनी चित्रपटसृष्‍टीत आणले.

बोनींनीही ठरवलं होतं श्रीदेवींना आपल्या चित्रपटात आणायचंच

बोनी यांची 'मिस्टर इंडिया' चित्रपट आणण्‍याची मोठी योजना होती आणि त्‍यानुसार त्‍यांनी हा चित्रपट मोठ्‍या पडद्‍यावर आणला. 'मिस्टर इंडिया'साठी अभिनेत्रीचा शोध सुरू असताना त्‍यावेळची टॉपची अभिनेत्री म्‍हणून श्रीदेवी यांचे नाव होते. बोनी कपूर यांना या चित्रपटात श्रीदेवी यांनाच साईन करायचे होते. 

Image result for boney and sridevi

श्रीदेवी यांना या चित्रपटात आणणे इतके सोपे नव्‍हते. श्रीदेवी आधी विचार करूनच मगच चित्रपट साईन करायच्‍या. बोनी चेन्नईमध्‍ये श्रीदेवी यांना साईन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या घरी पोहोचले. त्‍यांना श्रीदेवी यांच्‍याकडून वेळ मिळाला नाही. बोनी सतत श्रीदेवी यांच्‍या घरी जायचे आणि श्रीदेवी यांना भेटायचा प्रयत्‍न करायचे. बोनी यांनी खुद्‍द निवेदन दिल्‍यानंतर ७ दिवसांनी त्‍यांना भेटण्‍यासाठी वेळ देण्‍यात आला. बोनी यांना वाटलं की, टाळाटाळ केली जात आहे.

Image result for boney and sridevi

त्‍यांनी चेन्नईमध्‍ये थांबण्‍याचा निर्णय घेतला. एक दिवस, बोनी श्रीदेवी यांना भेटलेच आणि आपल्‍या चित्रपटात काम करावे, अशी विनंती केली. अखेर त्‍यांच्‍या विनंतीला मान देऊन श्रीदेवी चित्रपटात काम करायला तयार झाल्‍या. नंतर 'मिस्टर इंडिया' चित्रपट आला आणि चित्रपटाने १९८७ मध्‍ये मोठे यश मिळवले.

त्‍यानंतर बोनी यांनी आपला आणखी एक महत्वाकांक्षी चित्रपट 'रूप की रानी चोरों का राजा' श्रीदेवी यांना मुख्‍य भूमिकेत घेऊन बनवला. हा चित्रपट अयशस्‍वी ठरला. श्रीदेवी सहजतेने कुणावर विश्‍वास करायच्‍या नाहीत. परंतु, बोनी यांच्‍यावर त्‍यांचा विश्वास बसला. 

Image result for boney and sridevi

बोनी हे त्‍यांचा भाऊ अनिल कपूर आणि श्रीदेवी स्‍टारर 'जुदाई' चित्रपट बनवत होते. त्‍याचदरम्‍यान, श्रीदेवी यांची आई राजेश्वरी यांची तब्‍येत बिघडली. त्‍यांना उपचाराकरिता अमेरिकेला घेऊन गेले. त्‍यावेळी श्रीदेवी या बोनी कपूर यांना सोबत घेऊन गेल्‍या. श्रीदेवी यांच्‍या आईच्‍या उपचारावेळी बोनी कपूर यांनी त्‍यांना पाठिंबा दिला. परंतु, श्रीदेवी यांच्‍या आईचे निधन झाले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍या आईवर चुकीच्‍या पध्‍दतीने उपचार झाल्‍याचा आरोप करत कोर्टात खटला दाखल केला आणि संघर्ष करून मोबदला वसूल केला. 

'जुदाई'च्‍या निर्मितीवेळी श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले बोनी 

श्रीदेवी यांनी अनुभवले की, बोनी नि:स्वार्थ भावनेने हे सर्व करत होते. बोनी विवाहित आहेत, हे माहिती असतानादेखील श्रीदेवींना बोनी यांच्‍याशी प्रेम झाले. 'जुदाई' या चित्रपटाच्‍या निर्मितीवेळी बोनी श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले होते.

Image result for boney and sridevi

त्‍यानंतर बोनी यांनी श्रीदेवी यांच्‍याशी विवाह केला. त्‍यावेळी बोनी यांना आपल्‍या कुटुंबीयांकडून नाराजीचा सामनादेखील करावा लागला. बोनी यांचा दुसरा विवाह असल्‍याने त्‍या काळात हे प्रकरण खूप वादग्रस्‍त ठरले होते. मीडियापासूनची ही गोष्‍ट लपवून ठेवण्‍यात आली होती. श्रीदेवी यांनी जुदाईनंतर काही काळासाठी अभिनय संन्‍यास घेतला होता.