मुंबई : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी' या चित्रपटाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. तर या चित्रपटातील नव्याने आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत अक्षय कुमारसोबत कॅटरीना कैफ दिसत आहे. दोघांनी आपापल्या डोक्याला टॉवेल गुडांळल्याचे दिसत आहे. 'सुर्यवंशी' चित्रपटात 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याचा धमाकेदार रिमेक पाहायला मिळणार आहे. सध्या या गाण्याचे शूटिंग सुरू आहे.
'टिप टिप बरसा पानी' या ओरिजीनल गाण्यात पिवळ्या साडीत रवीना टंडन डान्स करताना दिसली होती. आता अक्षय कुमार ‘सूर्यवंशी’मध्ये या गाण्याचे रीमिक्स बनणार आहे. अक्षयने ट्विट करत लिहिले आहे....
'सुर्यवंशी' या चित्रपटातील गाण्यात रवीनाची जागा कॅटरीनाने घेतली आहे. अक्षय कुमारने हे गाणे किती महत्वाचे आहे यांचे उदाहरण पहिलेच दिले आहे. याशिवाय अक्षयने एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, 'जर या गाण्याच्या जागी रिमेकमध्ये दुसऱ्यांला घेतले असते तर ती निराश झाली असती. मी तुम्हाला सांगतो की, रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत, तर हा चित्रपट पुढील वर्षी मार्चमध्ये रिलीज होणार आहे.'
याशिवाय 'सुर्यवंशी' या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. या पोस्टरमध्ये अक्षय कुमार दहशतवाद्यांशी दोन हात करताना दिसले आहेत. तर रोहित शेट्टीसोबत पहिल्यांदाच अक्षय एकत्र काम करत आहेत.
याआधी अक्षयने 'सिंबा' आणि 'सिंघम' या चित्रपटातून धमाकेदार एन्ट्री केली होती. तर खूप कालावधीनंतर अक्षय कॅटरीनासोबत दिसणार आहे.
सुर्यवंशी' या चित्रपटाची टक्कर सलमानच्या 'इंशाल्लाह' या चित्रपटाशी होणार होती. परंतु 'सुर्यवंशी' या चित्रपटाची डेट बदलली गेली.
याशिवाय अक्षय कुमार 'लक्ष्मी बॉंम्ब' या चित्रपटातही झळकणार आहे.
(photo : katrinakaif, akshaykumar instagram वरून साभार)