Wed, Jun 03, 2020 07:32होमपेज › Soneri › स्मिता पाटीलचं चर्चेत राहिलं खासगी आयुष्य  

स्मिता पाटीलचं चर्चेत राहिलं खासगी आयुष्य  

Last Updated: Oct 17 2019 12:39PM

स्मिता पाटीलजन्मदिन विशेष 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

आज (१७ ऑक्‍टोबर) अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्मदिवस. स्मिता यांचा जन्म  १९५५ मध्‍ये पुण्‍यात झाला होता. त्‍यांच्‍या करिअरमध्‍ये चित्रपटांबद्‍दल जितकी चर्चा झाली, तितकं त्‍यांचं वैयक्‍तिक आयुष्‍यही चर्चेत राहिलं होतं. 

Image result for smita patil umbartha film

इंडस्‍ट्रीत असताना स्‍मिता यांचं अभिनेते राज बब्बर यांच्‍याशी अफेअर होतं. राज यांचा विवाह नादिरा जहीर यांच्‍याशी झाला होता. राज बब्‍बर विवाहीत असतानाही स्‍मिता आणि राज यांच्‍यात नातं निर्माण झालं. राज बब्‍बर यांच्‍याप्रमाणेच नादिरा यांनी देखील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून पदवी घेतली होती.

अधिक वाचा : स्मिता पाटीलची चित्रपटात येण्यामागची कहाणी 

Image result for smita patil umbartha film

सेटवर झालं प्रेम 

असं म्‍हटलं जातं की, 'भीगी पलकें' चित्रपटादरम्‍यान, राज बब्बर आणि स्मिता पाटील प्रेमात अडकले होते. राज बब्बर त्‍यावेळी स्मितासाठी काहीही करायला तयार होते. ८० दशकात दोघेही एकत्र राहू लागले. काही काळानंतर राज आणि स्मिता यांनी लग्‍न केलं. नादिराचा संसार मोडल्‍याचा आरोपही स्‍मिता यांच्‍यावर झाला. परंतु, स्‍मिता यांना त्‍या गोष्‍टीचा काही फरक पडला नाही. 

Related image

स्मिता पाटील आई झाल्‍या. प्रतीक बब्बरचा जन्म झाला. पहिल्‍याच मुलाच्‍या जन्‍मानंतर स्‍मिता आजारी राहायच्‍या. वयाच्‍या ३१ व्‍या वर्षी १३ डिसेंबर १९८६ ला त्‍यांचं निधन झालं. 

अधिक वाचा : ...अखेर स्‍मिता पाटीलने दिला होता रोमँटिक सीन 

 Image result for smita patil umbartha film

राज बब्बर यांची तीन अपत्‍ये 

राज यांना तीन अपत्‍ये. पहिल्‍या पत्‍नीपासून जूही आणि आर्य ही दोन अपत्‍ये तर स्‍मिता यांचा प्रतीक बब्बर हा मुलगा. स्मिता यांच्‍या निधनानंतर राज बब्बर पुन्‍हा आपल्‍या पहिली पत्नी नादिराकडे परतले. 

Related image

स्मिता यांचं निधन झाल्‍यानंतर त्‍यांचं पार्थिव सुहासिनीप्रमाणे सजवण्‍यात आलं होतं, मेकअप करण्‍यात आला होता. त्‍यांच्‍या पार्थिवाला मेकअप करणारे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंतने एका मुलाखतीत सांगितलं होतं, 'स्मिता यांनी मृत्‍यूनंतर ही इच्छा जाहीर केली होती की, आपल्‍या मृत्‍यूनंतर एखाद्‍या सुहासिनीप्रमाणे आपल्‍याला तयार करण्‍यात यावं.' 

Image result for smita patil and raj babbar

Related image