Mon, Dec 09, 2019 18:52होमपेज › Soneri › सिद्धार्थ-मृण्मयीच्‍या सिनेमाच्‍या ट्रेलरला १ मिलियन व्‍ह्‍युज

सिद्धार्थ-मृण्मयीच्‍या सिनेमाच्‍या ट्रेलरला १ मिलियन व्‍ह्‍युज

Published On: Jun 18 2019 1:11PM | Last Updated: Jun 18 2019 1:11PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

समीर जोशी दिग्दर्शित ‘मिस यू मिस्टर’ २८ जूनला प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी या मराठी चित्रपटामध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला होता. त्याचबरोबर सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर देखील प्रदर्शित करण्यात आला होता या ट्रेलरला अल्पावधीतच सर्व सोशल मीडिया साईटसवर १ मिलियन व्‍ह्‍युज मिळाले आहेत. 

या चित्रपटातील गाणी वैभव जोशी यांनी लिहिली असून आलाप देसाई यांचे संगीत आहे तर सोनू निगम, आनंदी जोशी, आलाप देसाई यांनी गाणे गायले आहे. दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली आहे. 

सिनेमामध्ये सिद्धार्थ चांदेकर ‘वरुण’ आणि मृण्मयी देशपांडे ‘कावेरी’ हे दोघे नवं विवाहित जोडपं आहे असं दिसतंय आणि वरुणला कामानिमित्ताने काही दिवसात लंडनला जावं लागत आणि सुरू होत ते 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' यादरम्यान बऱ्याच समस्या येतात असं दिसतंय, मग ते यातून कसा मार्ग काढतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना २८ जूनला सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा लागेल. हा संपूर्ण सिनेमा 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' वर भाष्य करणारा आहे.

या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची रसिकांमधील उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे.

‘मिस यू मिस्टर’चे दिग्दर्शक समीर जोशी म्हणाले, ही काही फक्त वरुण आणि कावेरीची गोष्ट नाही, तर कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. एकमेकांवर अतीव प्रेम असणाऱ्यांना एकमेकांपासून दूर रहायची वेळ आली तर ते अंतर फक्त शारीरिक नाही, पण त्यामुळे नात्यामध्ये अंतर पडतं? आणि जर असं अंतर पडलं तर ते मिटवण्यासाठी काय करावं, या सर्वांबद्दल हसत-खेळत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावत सांगितलेली ही गोष्ट आहे.