Sun, Jul 12, 2020 19:24होमपेज › Soneri › करीनाने आपल्‍या लग्‍नात एक्‍स बॉयफ्रेंड शाहिदला दिलं होतं आमंत्रण? 

करीनाने लग्‍नात 'या' एक्‍स बॉयफ्रेंडला दिलं होतं आमंत्रण? 

Published On: Jun 12 2019 1:42PM | Last Updated: Jun 12 2019 2:11PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता शाहिद कपूर सध्‍या चर्चेत आहे. त्‍याचा आगामी चित्रपट कबीर सिंगची उत्‍सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. आता या चित्रपटाच्‍या प्रमोशनसाठी शाहिदने एका शोमध्‍ये हजेरी लावली. यावेळी त्‍याने आपल्‍या आयुष्‍यातील अनेक इंटरेस्‍टिंग गोष्‍टींचा खुलासा केला. 

नेहा धुपियाचा चॅट शो बीएफएफएस विथ वोग (BFFs with Vogue) मध्‍ये शाहिदने उपस्‍थित लावली. यावेळी त्‍याला प्रश्‍न विचारण्‍यात आला की, तुला करीनाने तिच्‍या लग्‍नात आमंत्रण दिलं होतं का? 

यावर शाहिद म्‍हणाला, मला आठवत नाही. या गोष्‍टीला खूप वर्षे झाली आहेत. मला वाटतं की, करीनाने मला तिच्‍या लग्‍नात आमंत्रण दिलं नव्‍हतं.  
 
सैफ अली खानशी लग्‍न करण्‍यापूर्वी करीना कपूर शाहिद कपूरसोबत रिलेशनशीपमध्‍ये होती. परंतु, त्‍यांचा ब्रेकअप झाला.  
करीना आणि सैफ अली खानचे लग्‍न २०१२ मध्‍ये झाले होते. 

शाहिदने या गोष्‍टीचाही खुलासा केला की, प्रियांका चोप्राने मुंबईतील रिसेप्‍शनसाठी त्‍याला आमंत्रण दिलं होतं. म्‍हणूनच तो प्रियांकाच्‍या रिसेप्‍शन पार्टीसाठी गेला होता. प्रियांकाने निक जोनसशी गेल्‍यावर्षी लग्‍न केले आहे. शाहिदचे नाव प्रियांकाशीही जोडले गेले होते. शाहिद आणि प्रियांकाचाही ब्रेकअप झाला होता. 

चित्रपटांविषयी बोलताना शाहिद कपूर म्‍हणाला, 'मला रंग दे बसंती चित्रपट ऑफर झाला होता. मला खंत आहे की, मी हा चित्रपट नाही केला. मी या चित्रपटात सिद्धार्थची भू्मिका साकारायची होती. मी स्क्रिप्ट वाचून रडत होतो. मला कथा खूपच आवडली होती. परंतु, त्‍यावेळी मी हा चित्रपट करू शकलो नाही. 

शाहिद कपूरचा आगामी चित्रपट कबीर सिंह येत आहे. त्‍यामध्‍ये शाहिद कपूरसोबत कियारा आडवाणी मुख्‍य भूमिकेत दिसणार आहे. कबीर सिंह हा तेलुगु चित्रपट अर्जुन रेड्‍डीचा (२०१७) रिमेक आहे. संदीप वंगा हा चित्रपट दिग्‍दर्शित करत असून २१ जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे.  

शाहिद कपूरने २०१५ मध्‍ये मीरा राजपूतशी लग्‍न केले होते. त्‍यांना दोन मुले आहेत.